Homeताज्या बातम्यादेश

छत्तीसगड : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद

रायपूर : छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आयटीबीपीचे दोन जवान शहीद झाले आहेत. सहायक उपनिरीक्षक गुरुमुख सिंग (पंजाब) आणि डेप्

नवाब मलिकांचा बार फुसका, भाजपावर आरोप करणारे तोंडघशी (Video)
भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा पायचं छाटला.
आता गुन्हेगाराच्या संपत्तीतून मिळणार पीडित व्यक्तीला मोबदला; नव्या विधेयकात खास तरतूद

रायपूर : छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आयटीबीपीचे दोन जवान शहीद झाले आहेत. सहायक उपनिरीक्षक गुरुमुख सिंग (पंजाब) आणि डेप्युटी कमांडर सुधाकर शिंदे (नांदेड, महाराष्ट्र) अशी या शहीदांची नावे आहे. नक्षलवाद्यांनी कडेमेटा कॅम्पपासून 600 मीटर अंतरावर सैनिकांवर हल्ला केला.

सुरक्षा दलांनी चार दिवसांपूर्वी नक्षल प्रभावित दंतेवाडा जिल्ह्यात तीन नक्षलवाद्यांना अटक केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही कारवाई केल्याचे मानले जात आहे. सुरक्षा दलांनी दंतेवाडाच्या कुआकोंडा पोलीस स्टेशन परिसरातून तीन नक्षलवादी हंगा कर्टम (25), आयता माडवी (25) आणि पोज्जा उर्फ लाठी कर्तम (28) यांना अटक केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी पोलिसांचे पथक कुआकोंडा पोलीस ठाण्यातून बडेगुद्रा आणि अतेपाल गावाच्या दिशेने पाठवण्यात आले होते. जेव्हा टीम अतेपाल गावाजवळ जंगलात होती, तेव्हा तीन संशयित पळून जाऊ लागले. पोलिसांच्या पथकाने घेराव घातला आणि त्यांना पकडले. जेव्हा पोलीस पथकाने त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांची नावे हंगा कर्तम, आयता माडवी आणि पोज्जा उर्फ लाठी कर्तम असल्याचे सांगितले. या कारवाईनंतर जवानांनी या परिसरात शोध मोहिम हाती घेतलीय. त्यानंतर्गत आज, शुक्रवारी जवान गस्तीवर असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला चढवला. यात गुरुमुख सिंग आणि सुधाकर शिंदे यांना हौतात्म्य आले. यानंतर नक्षलवाद्यांनी जवानांकडून एके -47 रायफल, दोन बुलेटप्रूफ जॅकेट आणि वॉकी टॉकी लुटून पळ काढला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.

COMMENTS