खाद्य तेलाची आयात 40 टक्क्यांनी कमी करणार- तोमर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खाद्य तेलाची आयात 40 टक्क्यांनी कमी करणार- तोमर

नवी दिल्ली : देशातील खाद्यतेलाची आयात 2029-30 पर्यंत 40 टक्क्यांनी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आ

फडणवीसांच्या मुत्सद्दीच्या एका दगडात तीन सावज!
दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधींनी फटकारले

नवी दिल्ली : देशातील खाद्यतेलाची आयात 2029-30 पर्यंत 40 टक्क्यांनी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज गुरुवारी सांगितले. देशात दरवर्षी 1.25 कोटी टन खाद्यतेलाची आयात केली जाते, यात पाम तेलाचा वाटा 56 टक्के आहे, याकडे लक्ष वेधत तोमर म्हणाले की, देशातील 28 लाख हेक्टर जमिनीवर पामची शेती केली जाऊ शकते, यात ईशान्येकडील 9 लाख हेक्टर जमिनीचा समावेश आहे. सरकारने पाम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एका मिशनची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक वाढणार असून, मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होणार आहे, त्यामुळे याचा थेट फायदा शेतकर्यांना होईल. त्याचप्रमाणे खाद्यतेलाची आयातही कमी होईल, परिणामी परकीय चलनाचीही बचत होईल.

देशातील 80 टक्के शेतकर्यांकडे 2 हेक्टरपेक्षाही कमी शेतजमीन आहे, या शेतकर्यांना डोळ्यासमोर ठेवूनच कृषी क्षेत्रात सुधारणा केल्या जात आहे, असे स्पष्ट करीत तोमर म्हणाले की, पंतप्रधान पीक विमा योजना, किमान हमी भावात दीडपटीने वाढ करणे, कमी दरात बँकांचे कर्ज मिळावे म्हणून किसान क्रेडिट कार्ड, सौर ऊर्जेशी संबंधित योजना शेतीपर्यंत पोहोचवणे, देशात 10 हजार शेतकरी उत्पादन समूह तयार करणे, आदी योजनांचा यात समावेश आहे. छोट्या शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठीच किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली, या योजनेतून देशातील 11 कोटी शेतकर्यांच्या खात्यात 1.58 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहे, याकडे तोमर यांनी लक्ष वेधले.

COMMENTS