मुंबई : जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील विविध पाणी पुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी प

मुंबई : जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील विविध पाणी पुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयातील दालनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार हिकमत उधाण, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक प्रतिनिधी सुषमा सातपुते, मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह मतदारसंघातील पाणीपुरवठा संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, मराठवाड्यातील पाणी पुरवठ्याची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. येत्या पंधरवड्यात कामांची पाहणी करण्यात येईल. चुकीची माहिती देण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा कामांमध्ये काही कंत्राटदारांकडून होत असलेली दिरंगाई लक्षात घेता, अशा कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
सध्या प्रगतीपथावर असलेल्या कामांना अधिक गती देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर लाभ मिळू शकेल. मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या सर्व योजनांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS