Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुरंदरमधील जिल्हा बँकेस 22 कोटींचा नफा

सासवड / प्रतिनिधी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षात पुरंदर तालुक्यातील 13 शाखांमधून 27 हजार 731

इस्लामपूरातील प्रभाग 11 मध्ये काट्याच्या लढती…?
पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन
वीरनारी शेतकरी उत्पादन कंपनीला भारतीय सेनेचे बहुमूल्य योगदान

सासवड / प्रतिनिधी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षात पुरंदर तालुक्यातील 13 शाखांमधून 27 हजार 731 सभासदांना 288 कोटी 68 लाख 18 हजार इतके कर्ज वाटप केले होते. त्यापैकी 237 कोटी 19 लाख 62 हजार रुपये एवढी रक्कम वसूल झाली. 51 कोटी 48 लाख 56 हजार थकबाकी असून, एकूण 82.17 टक्के एवढी वसुली झाली आहे. बँकेला 22 कोटी 65 लाख 40 हजार रुपये इतका नफा झाल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक व पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी दिली.
चालू खरीप हंगामाला एक एप्रिल 2025 पासून सुरुवात झाली असून तालुक्यातील 95 संस्थांपैकी 95 संस्थांचे पिक कर्ज मंजूर झाले आहे. 7 एप्रिल पासून खरीप हंगाम वाटपास सुरुवात झाली आहे. याबाबत संचालक संजय जगताप यांनी तालुक्यातील सर्व विकास अधिकारी व सचिव यांची बैठक घेऊन ज्या शेतकरी सभासदांनी 31 मार्च अखेर त्यांच्याकडील कर्जाचा भरणा केला असेल तेवढी रक्कम वाटप करण्याच्या सूचना केल्याची माहिती विभागीय अधिकारी महेश खैरे यांनी दिली.
दरम्यान, 30 एप्रिल 2025 पर्यंत 15 हजार 529 सभासदांना 12195 हेक्टर क्षेत्रावर 150 कोटी 46 लाख इतके कर्ज वाटप केले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकरी सभासदांना तालुक्यातील 13 शाखांमधून खरिपाचे पीक कर्ज वाटप पूर्ण करण्याच्या सूचना संचालक जगताप यांनी दिल्या. बैठकीस वसुली अधिकारी किरण जाधव, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, विकास अधिकारी राजन जगताप, अण्णा शिंदे, शिरीष जाधव, मयूर भुजबळ, पवन दुर्गाडे, सूर्यकांत जगताप, शिरीष जाधव, सचिव रफिक शेख, तुकाराम गायकवाड, हनीफ सय्यद, रवींद्र कांबळे, संदीप ताकवले, दीपक जगताप, अमोल यादव, विजय कांबळे, वैभव काकडे, अमोल फडतरे, जालिंदर बाठे, रसूल शेख, संतोष गुरव, सोमनाथ चव्हाण, दादा खोमणे, चंदू खोमणे, नितीन जगताप, सतीश शिंदे, सुहास जगताप इत्यादी उपस्थित होते.
100 टक्के वसुली असलेल्या विकास सोसायट्याली हिवरे, कुंभारवळण, सासवड नं. 3, नीरा शिवतक्रार, गुळुंचे, जयमल्हार जेऊर, जेऊरग्राम जेऊर, पिंपरे खुर्द, भैरवनाथ पिसुर्टी, भैरवनाथ गुळुंचे, शिवशंभो बेलसर, भोसलेवाडी, कर्‍हा धालेवाडी, कोथळे, नाझरे सुपे, बोरमलनाथ पांडेश्‍वर, जयाद्री जेजुरी, हरगुडे, माहूर, पानवडी, तोंडल, श्रीनाथ वीर, धनकवडी, काळदरी, मांडकी नं. 2, ज्योतिर्लिंग मांडकी या विविध कार्यकारी सोसायट्यांची वसुली 100 टक्के आहे.

COMMENTS