सातारा / प्रतिनिधी : सातारच्या साहित्य क्षेत्राला संजीवनी देणार्या मसाप शाहूपुरी शाखेने गेल्या 13 वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. मसाप शाहूपुरी शाख
सातारा / प्रतिनिधी : सातारच्या साहित्य क्षेत्राला संजीवनी देणार्या मसाप शाहूपुरी शाखेने गेल्या 13 वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. मसाप शाहूपुरी शाखेतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून कराडचे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना श्री. छ. थोरले प्रतापसिंह महाराज जीवन गौरव पुरस्कार तर जिल्ह्यातील विविध साहित्यिकांच्या कलाकृतींना पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती मसाप, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात, साहित्य पुरस्कार योजना सातारा जिल्ह्यातील उत्तम साहित्यकृतींना देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार श्री. छ. थोरले प्रतापसिंह महाराज जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना, उत्तम बंडु तुपे कादंबरी पुरस्कार विद्या पोळ-जगताप यांच्या ’बाय ग’ या कादंबरीस, प्रा. अजित पाटील कथा पुरस्कार पद्माकर पाठकजी यांच्या ’रंग प्रेमाचे-बदलत्या काळाचे’ या कथासंग्रहास, बा. सी. मर्ढेकर कविता पुरस्कार निलेश महिगावकर यांच्या ’लास्ट इयरची वही’ या कविता संग्रहास, वासंती मुजुमदार संकीर्ण साहित्य पुरस्कार डॉ. मोहन सुखटणकर यांच्या निसर्गाचे गोड गुपित यौवन स्पर्श भाग 1 व 2 या साहित्यास जाहीर करण्यात आला आहे. सर्व पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, शाल, सन्मान चिन्ह असे आहे. या पुरस्कारांचे वितरण शाहूपुरी शाखेच्या वर्धापन दिन समारंभात केले जाणार आहे. जीवन गौरव पुरस्कार निवड समितीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकिहाळ, डॉ. उमेश करंबेळकर, विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत यांचा समावेश होता.
COMMENTS