पाथर्डी : शालेय जीवनातील स्पर्धा ही राज्यसेवा व लोकसेवा स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी आहे. या शालाबाह्य स्पर्धा परीक्षा यशाकडे जाण्याची खरी पायाभ
पाथर्डी : शालेय जीवनातील स्पर्धा ही राज्यसेवा व लोकसेवा स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी आहे. या शालाबाह्य स्पर्धा परीक्षा यशाकडे जाण्याची खरी पायाभरणी आहे असे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर पाथर्डी या शाळेतील राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेत ४५ विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड होते. यावेळी आव्हाड म्हणाले,की शालेय स्तरावर विविध स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थ्यांची यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी होते.विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होऊन चांगल्या प्रकारे यश संपादन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे महत्त्वाचे स्थान आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीमध्ये मोबाईल पासून अलिप्त राहून विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करावे तसेच मैदानी खेळ खेळावेत असे आवाहन यावेळी केले. शाळेतील इयत्ता चौथीतील हर्षनिता दिलीप ठोंबरे व इयत्ता दुसरी मधील आतार माहिरा रईस या विद्यार्थिनींची राज्यगुणवत्ता यादीत निवड झाली तसेच १८ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तर २५ विद्यार्थी तालुका गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना फेटे बांधून व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी केले तर आभार अनुजा कुलकर्णी यांनी मानले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका अनुजा कुलकर्णी,जयश्री एकशिंगे, मनिषा गायके, आशा बांदल,राधिका सरोदे, ज्योती हंपे ,किर्ती दगडखैर, विद्या महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
COMMENTS