श्रीरामपूर ; श्रीरामपूर नगर परिषदेचे 100 दिवशीय 7 कलमी कृती आराखडा या उपक्रमा अंतर्गत बीज गोल तयार करणे या उपक्रमासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने शहर
श्रीरामपूर ; श्रीरामपूर नगर परिषदेचे 100 दिवशीय 7 कलमी कृती आराखडा या उपक्रमा अंतर्गत बीज गोल तयार करणे या उपक्रमासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील बचत गट व शहरातील नगरपालिका शाळा यांच्या समावेश लोकमान्य टिळक वाचनालयात मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली .
माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रीरामपूर नगरपरिषद, श्रीरामपूर १०० दिवसीय ७ कलमी कृती आराखडा माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बीज गोळे (Seed Balls) बनविण्याची कार्यशाळा लोकमान्य टिळक वाचनालय येथे आयोजित करण्यात आलेली होती. बिज गोळा करणे बीज गोळे (सीड बॉल्स) बनवण्याची प्रक्रिया आणि वापर मिश्रण – माती व कंपोस्ट एकत्र करण्यात आला. पाणी मिश्रण – माती चिकट होईपर्यंत हळू हळू पाणी मिसळा.मातीचे गोळे बनवुन- थोडी माती घेऊन त्यात छोटा खड्डा केला. त्यात बियाणे टाकले आणि त्याचा गोळा बनवला. सीड बॉल्स सुकवणे – बीज गोळे २४ ते ४८ तासाच्या कालावधीसाठी सूर्यप्रकाश नसणाऱ्या खोलीत सुकवावे.वापर – ठरवलेल्या ठिकाणी बीज गोळे लावा किंवा पसरवा. 48 तास अंधाऱ्याखोलीत ठेवून पावसाळ्यात त्याचा वापर करावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी प्रशासक श्रीरामपूर नगरपरिषद किरण सावंत पाटील,मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप ,उपमुख्यअधिकारी महेंद्र तापाकीर, प्रशासनाधिकारी संजीवन दिवे, ग्रंथपाल स्वाति पुरे बचत गटप्रमुख वर्षा पाठक ,आस्थापन प्रमुख प्राची चितळे, रुपेश गुजर ,किशोर त्रिभुवन ,शहर समन्वयक प्रमोद चव्हाण ,मंगल रेड्डी, साक्षी अहिरे , राजू बोरकर ,यश अहिरे ,स्वप्निल माळवे, राजेश जेधे,विजय झिंगारे, दीपक व्यवहारे ,सिद्धार्थ गवारे, नवनाथ अकोलकर, संभाजी त्रिभुवन, शहरातील बचत गट व न.पा. शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक उपस्थित होते .
यावेळी नगरपालिका शाळेचे कल्पना जगताप, सोमनाथ काळे, सचिन शिंदे, कौसर अलीमोद्दीन, ,समीनाबानो इब्राहिम, शगूफता खान, सना पठाण ,मिनाज शेख, असमाजबीन पटेल, स्मिता गायकवाड प्राची लोळगे आदी उपस्थित होते.
COMMENTS