Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी शहरात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; शिवप्रेमींचा संताप

देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील बुवासिंध बाबा व्यायामशाळा तालीम मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध्याकृती पुतळ्याच्या चेहर्‍याला

जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये – मुख्यमंत्री फडणवीस
शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका रस्त्यावर
जळगावमध्ये एसटीचा अपघात, 10 प्रवासी जखमी

देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील बुवासिंध बाबा व्यायामशाळा तालीम मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध्याकृती पुतळ्याच्या चेहर्‍याला अज्ञात समाजकंटकांने काळे रंग लावुन तसेच जिरेटोपाची देखील तोडफोड करुन विटंबना केल्याची घटना आज बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे. शिवप्रेमींनी तालिम बाहेर मोठी गर्दी केली. चार तास नगर मनमाड महामार्गावर रास्तारोको करण्यात आला.
नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुतळ्याच्या विटंबनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आणि तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन आपला रोष व्यक्त केला. स्थानिक नागरिक आणि तरुणांनी तालमीभोवती गर्दी केली. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती पोलिसांना समजतात घटनास्थळी श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले आहे. घटनास्थळी आक्रमक शिवभक्तांचा मोठा जमाव जमला असुन त्यांनी नगर-मनमाड महामार्ग रोखून धरत जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला आहे.घ टनास्थळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त जमा झाले असून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींतून मोठा संताप व्यक्त होत आहे.

COMMENTS