Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्य कार्यकर्त्याची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड हे संविधानाचे सामर्थ्य: उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई, दि. २६ : एक सामान्य कार्यकर्ता विधानसभेच्या उपाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर विराजमान होतो हे आपल्या संविधानाचे सामर्थ्य आहे, असे स्पष्ट कर

श्रीरामपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसाना सेवेत घेण्यासाठी धरणे आंदोलन
अ‍ॅड. आंबेडकर अकोल्यातून लढणार लोकसभा निवडणूक
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा बंजारा रंगात रंगला होळी उत्सव

मुंबई, दि. २६ : एक सामान्य कार्यकर्ता विधानसभेच्या उपाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर विराजमान होतो हे आपल्या संविधानाचे सामर्थ्य आहे, असे स्पष्ट करत विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सदस्य अण्णा बनसोडे यांची  निवड झाल्याबद्दल त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अण्णा बनसोडे यांच्या सामाजिक व राजकीय  कारकिर्दीचा उल्लेख करत सांगितले की, एक साधा कार्यकर्ता ते विधानसभेचा उपाध्यक्ष हा प्रवास प्रेरणादायी आहे. ते जनतेच्या विश्वासावर पुढे आले असून, त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला निश्चितच लाभ होईल. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे शासन सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या या सभागृहात सामान्य कार्यकर्त्याची उपाध्यक्षपदी निवड झाली याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. उपाध्यक्ष पदावरून अण्णा बनसोडे सभागृहातील सदस्याच्या प्रश्नातून राज्यातील जनतेला न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे अभिनंदनपर भाषणात म्हणाले, विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी सदस्य अण्णा बनसोडे यांच्या निवड प्रक्रियेत सर्वपक्षीय सहकार्याचे वातावरण दिसून आले. विरोधी पक्षातील नेत्यांनीही सकारात्मक भूमिका घेत श्री.बनसोडे यांच्या निवडीला पाठिंबा दर्शवला, याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचेही आभार मानले आणि उपाध्यक्षपदी विराजमान झालेल्या अण्णा बनसोडे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS