Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष !

मुंबई ः विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार होती, मात्र राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांनी निवड

वारीत साई चरित्र साखळी पारायण सोहळा उत्साहात 
माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’, 3 ते 4 महिन्यांत प्रमाणपत्र मिळणार
रेणापूर बाजार समिती लातूरप्रमाणे विकसित करणार

मुंबई ः विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार होती, मात्र राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांनी निवड बिनविरोध झाली आहे, मात्र त्याची औपचारिक घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी करण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजकुमार बडोले, संजय बनसोडे व अण्णा बनसोडे या 3 नेत्यांची नावे चर्चेत होती. अखेर या अण्णा बनसोडे यांनी बाजी मारली. या पदासाठी महायुतीकडून अण्णा बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता. तो मंगळवारी दुपारी झालेल्या पडताळणीत वैध ठरला. त्यामुळे त्याची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी दुपारी सभागृहात करतील.

COMMENTS