Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर हिंसाचाराचा सुनियोजित पॅटर्न ! : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : नागपुरात सोमवारी रात्री हिंसाचारात अनेक प्रकारच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच या दंगलीत 33 पोलिस जखमी झाले असून, या प्रकरणानंत

 फडणवीस महिलांवर फिदा झाले आहेत
सर्व सौर योजनांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने पूर्ण करावी : दत्तात्रय पडळकर
अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा

मुंबई : नागपुरात सोमवारी रात्री हिंसाचारात अनेक प्रकारच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच या दंगलीत 33 पोलिस जखमी झाले असून, या प्रकरणानंतर त्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. यासंदर्भात निवेदन करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर हिंसाचाराचा एक सुनियोजित पॅटर्न दिसून येत आहे, या दंगलीत तीन पोलिस उपायुक्त जखमी झाले असून त्यातील एकावर चक्क कुर्‍हाडीने वार करण्यात अल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांवर हल्ला करणारे जे कुणी असतील, त्यांना सोडणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिला आहे.
यासंदर्भातील घटनेचा सविस्तर वृत्तांत सांगतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सोमवारी नागपुरातील महाजल परिसरात विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ’औरंगजेबाची कबर हटाव’ असे आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी हा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की, सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. यामुळे अत्तररोडमधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव त्या ठिकाणी जमला. हा जमाव नारेबाजी करू लागला. याच लोकांनी आग लावून टाकू, असे हिंसक बोलण्यास सुरूवात केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार द्यायची आहे, अशी मागणी केल्याने त्यांना गणेशपेठ पोलिस ठाण्यात निमंत्रित करण्यात आले. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागात 200- 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले. या घटनेत काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. तिसरी घटना भालदारपुरा सायंकाळी 7.30 वा. झाली. तिथे 80 ते 100 लोकांचा जमाव होता. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामु्ळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत 1 क्रेन, 2 जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

3 पोलिस उपायुक्तांसह 33 पोलिस जखमी
नागपूर हिंसाचारात एकूण 33 पोलिस जखमी झाले असून, त्यात 3 उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत. त्यापैकी एका पोलिस उपायुक्तावर कुर्‍हाडीने हल्ला करण्यात आला आहे. एकूण 5 नागरिक जखमी झालेत. तिघांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 2 रुग्णालयात आहेत. एक आयसीयूत आहेत. एकूण 3 गुन्हे गणेशपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेत. तहसील पोलिस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे एकूण 5 गुन्हे असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

पोलिसांवर हल्ला करणार्‍यांना सोडणार नाही
पोलिसांवर हल्ला करणार्‍या कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचा कडक इशारा मुख्यमंत्रीफडणवीस यांनी दिला. कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्याची जात, धर्म न पाहता त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. पोलिसांवर जर हल्ला केला तर त्याला सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिला आहे.

COMMENTS