Homeताज्या बातम्यादेश

महाकुंभातून मिळाले एकतेचे अमृत : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित करतांना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देश पुढील एक हजार वर्षांसाठी कसा तयार होत आहे,

सत्ता संघर्षात संबंधामुळे कोणीच बोलायला व वाईटपणा घ्यायला तयार नाही : खासदार डॉ.सुजय विखे.
आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृतसंघाकडून रामनवमी महोत्सवाचे आयोजन
WI दौऱ्यासाठी T20 टीमची घोषणा

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित करतांना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देश पुढील एक हजार वर्षांसाठी कसा तयार होत आहे, ते मी पाहिले आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा मी पाहिली आहे, तसेच प्रयागराज येथील महाकुंभ देखील पाहिला आहे, अनुभवला आहे. महाकुंभ देखील राष्ट्रीय जागृतीचे प्रतिबिंब असून या महाकुंभातून एकतेचे अमृत बाहेर पडले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, देशाची सामूहिक जाणीव देशाची ताकद दर्शवते. जेव्हा वेगवेगळ्या प्रदेशांचे आणि वेगवेगळ्या भाषांचे लोक संगममध्ये घोषणा देतात तेव्हा एक भारत, महान भारताची भावना दिसून येते. तिथे लहान-मोठ्यात फरक नव्हता. यावरून असे दिसून येते की एकतेचा अद्भुत घटक आपल्यात रुजलेला आहे. ही एकतेची भावना भारतीयांचे भाग्य आहे. जगात विघटनाच्या या काळात, एकतेचे हे प्रचंड प्रदर्शन ही आपली ताकद आहे. ही आमची खासियत आहे; आम्ही हे सांगत आलो आहोत आणि अनुभवत आहोत. प्रयागराज महाकुंभात आम्ही त्याचे भव्य स्वरूप अनुभवले आहे. ही भावना समृद्ध करत राहण्याची जबाबदारी आपली असल्यचे देखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS