Homeताज्या बातम्यासंपादकीय

आका, बोकाचं वास्तव काय ?

   आका, खोका आणि बोका या तीन शब्दांभोवती गेली तीन महिने महाराष्ट्र फिरवला जातो आहे. आकाचे आका आणि हे बोलणारा त्याचा बोका या दोघांच्या मधला संघर्ष

आधीच क्रिमी लेयरचे ग्रहण, त्यात भंपक डॉक्टरचा स्टंट !
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची परखडता ! 
उध्दव ठाकरे : पुरोगामी गुण चिकटलेला नेता !

   आका, खोका आणि बोका या तीन शब्दांभोवती गेली तीन महिने महाराष्ट्र फिरवला जातो आहे. आकाचे आका आणि हे बोलणारा त्याचा बोका या दोघांच्या मधला संघर्ष हा महाराष्ट्राला वेठीस धरणारा आहे. त्याहीपेक्षा बारा बलुतेदार समाजाच्या राजकीय हक्कांची मागणी या काळात प्रभावीपणे मांडायची असताना, या भोवती संपूर्ण राजकारण खेळवून महाराष्ट्रातल्या बारा बलुतेदार समाजाला ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग अवरूध्द केला जातो आहे. त्यामुळे हे आका, खोका आणि बोका यांचं बस्तान वेळीच आवरलं गेलं पाहिजे. कारण, यामुळे महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या तळातील असलेल्या जातींना आपला राजकीय लढा देता येत नाहीए. लवकरच महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत; यामध्ये राजकीय मागण्या पुढे येतील. या सगळ्या वातावरणाला दाबून टाकण्यासाठी हा तथाकथित संघर्ष लावून धरला जातो आहे. प्रसारमाध्यम यामध्ये जेवढे रंगवता  येईल, तेवढे, रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सामाजिक प्रश्नाचा एक तिढा सुटावा याचं भान मात्र कुणालाही राहिलेलं नाही. त्यामुळे अशाप्रकारे महाराष्ट्राला वेठीस धरणाऱ्या आणि राजकीय सत्तेत वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा मार्ग देखील प्रशस्त केला गेला पाहिजे! कारण, अशा प्रकारचे बेजबाबदार लोकप्रतिनिधी ज्यांचा पोलीस प्रशासनापासून तर कुठल्याही प्रशासनावर दबाव राहिलेला नसेल, तर, त्यांनी आपल्या राजकीय भूमिका बासनात गुंडाळून, आपले राजकीय करिअर हे संपुष्टात आणावं.  महाराष्ट्राच्या समाजातील अधिक धडपडणाऱ्या सामाजिक लोकांना, त्या भूमिकेमध्ये येऊ देण्यासाठी रस्ते मोकळे करावे. केवळ तीनच शब्दांच्या भोवती जर संपूर्ण महाराष्ट्राचा संघर्ष वेठीस धरला जात असेल तर ती गोष्ट समाज घटकांवर अन्याय करणारी आहे.  या ठिकाणी ठासून सांगतो आहोत. महाराष्ट्रातला तरुण हा दिवसेंदिवस बेरोजगार होत असल्यामुळे त्याच्या हाताला काम नाही. मनाने सैरभैर झालेला, आयुष्य आणि जगावं कसं, हा प्रश्न घेऊन, या राज्यातला तरुण इथल्या नेत्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना खुले आम मूर्त स्वरूप देत आहे.  तेच नेते आका,खोका, बोका हे करत फिरत आहेत. ही मात्र अतिशय लाजिरवाणी बाब आहे. अवघ्या १८ ते २० चे मुलं रस्त्यावर सशस्त्र पणे वावरताना दिसत आहेत. सर्वसामान्य तरुणांचे आयुष्य उध्वस्त होण्याची ही वेळ आलेली असताना आणि ते समोर नजरेला दिसत असताना, केवळ आका,बोका खोक्यांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवणाऱ्या नेत्यांचा आधी बंदोबस्त  करायला हवं. एखाद्या अन्यायच्या विरोधात न्याय मिळवण्याचा लढा म्हणून मिरवणारे हे स्वतःच गुन्हेगारी कृती आणि कृत्यांना कसं प्रवृत्त करत आहे, हे खोका आणि बोकाच्या निमित्ताने आता समोर आलेले आहे. अशाप्रकारे महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक जीवन तणावग्रस्त बनवून आणि समाजाच्या हक्काच्या मागण्या दावणाचाही हा एक भाग आहे आणि त्यामुळे आकार ओरडत असणाऱ्या प्रवृत्तींचाच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विरोधात चालवलेलं हे एक प्रकारचं षडयंत्र आहे. या शिवाय, यामध्ये अन्य काही दिसत नाही. जर, यावर कारवाई करायचीच असेल तर राज्याच्या विरोधी पक्षांनी, सत्ताधाऱ्यांनी मिळून आपल्या राज्याची सुरक्षितता कायम केली पाहिजे.

COMMENTS