Homeताज्या बातम्यादेश

भारत-मॉरिशसमध्ये अनेक सामंजस्य करार

पोर्ट लुईस : पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशस या भेटीदरम्यान  दोन्ही देशांमधील विकास भागीदारी आणखी  वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मॉरिशसमध्ये नवीन सं

स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येणार : मंत्री विजय वडेट्टीवार
लाडकी बहीण योजनेत भावांची घुसखोरी
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ हेल्पलाइन
Image

पोर्ट लुईस : पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशस या भेटीदरम्यान  दोन्ही देशांमधील विकास भागीदारी आणखी  वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मॉरिशसमध्ये नवीन संसद भवन उभारण्यासाठी आणि उच्च प्रभावाच्या सामुदायिक विकास प्रकल्पांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भारताचे पाठबळ असल्याचेही घोषित केले.

करार/सामंजस्य करार

1.   भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ मॉरिशस यांच्यात सीमापार व्यवहारांसाठी स्थानिक चलनांच्या (आयएनआर किंवा एमयूआर) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी एक चौकट स्थापन करण्याचा करार.

2.   मॉरिशस सरकार (कर्जदार म्हणून) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (कर्ज देणारी बँक म्हणून) यांच्यात कर्ज सुविधा करार.

3.   मॉरिशस सरकारचे उद्योग, एसएमई आणि सहकार मंत्रालय (एसएमई विभाग) आणि भारत सरकारचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय यांच्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील सहकार्याबाबतचा सामंजस्य करार.

4.   सुषमा स्वराज विदेश सेवा संस्था, परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार आणि परराष्ट्र व्यवहार, प्रादेशिक एकता आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रालय, मॉरिशस सरकार, यांच्यातील सामंजस्य करार.

5.   मॉरिशस सरकारचे लोकसेवा आणि प्रशासकीय सुधारणा मंत्रालय (एमपीएसएआर) आणि भारत सरकारचे प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे राष्ट्रीय सुशासन केंद्र (एनसीजीजी) यांच्यातील सामंजस्य करार.

6.   भारतीय नौदल आणि मॉरिशस सरकार यांच्यात व्हाईट शिपिंग बाबत माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतचा तांत्रिक करार.

7.   भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आयएनसीओआयएस), पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), कॉन्टिनेंटल शेल्फ विभाग, सागरी क्षेत्र प्रशासन आणि अन्वेषण विभाग (सीएसएमझेडएई), मॉरिशस सरकार, यांच्यातील सामंजस्य करार.

8. सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि मॉरिशस प्रजासत्ताकचा आर्थिक गुन्हे

 आयोग (एफसीसी) यांच्यात सामंजस्य करार

अनु क्र. – प्रकल्प

1.   अटलबिहारी वाजपेयी लोक सेवा आणि नवोन्मेष संस्था, केप माल्हेरेक्स येथील मॉरिशस क्षेत्रीय आरोग्य केंद्र आणि 20 एचआयसीडीपी प्रकल्पांचे (नाव अद्ययावत केले जाईल) उद्घाटन.

हस्तांतरण

COMMENTS