Homeताज्या बातम्यासंपादकीय

महिला सुरक्षेचा बोजवारा !

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुण्यातच महिला सुरक्षित नसल्याचे वास्तव्य समोर येत आहे. खरंतर महिलांच्या सुरक

मंत्रिमंडळाचा विस्ताराचा पेच
भीती नको, सावधगिरी बाळगा
निवडणूक आणि सोशल मीडिया

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुण्यातच महिला सुरक्षित नसल्याचे वास्तव्य समोर येत आहे. खरंतर महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत राज्य किती उदासीन आहे, हेच पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील बलात्काराच्या घटनेवरून दिसून येत आहे. बदलापूर घटनेनंतर आरोपीचे एन्काउंटर करण्यात आले, खरंतर यावरून अनेक प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र बदलापूर घटनेनंतर तरी राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलण्याची खरी गरज होती. सार्वजनिक ठिकाणी, तसेच खासगी ठिकाणी महिला सुरक्षतितेसाठी काय उपाययोजना केल्या होत्या, याचा आढावा घेवून जर सरकारने उपाययोजना केल्या असत्या तर, स्वारगेट येथील घटना घडली नसती. खरंतर स्वारगेट येथील जी घटना घडली, त्याला आगारप्रमुख देखील तितकेच जबाबदार आहेत. या संपूर्ण परिसरांची आरोेपीला चांगलीच ओळख असणार यात शंकाच नाही. ज्या ठिकाणी शिवशाही बस उभी होती, त्या बसचा दरवाजा उघडा कसा होता? हा देखील महत्वाचा प्रश्‍न आहे. मुळातच बसस्थानकावर उभ्या असणार्‍या शिवशाही बसचे दरवाजे हे विशिष्ट अशा यंत्रणेने उघडतात आणि बंद होतात, असे असतांना या गाडीचा दरवाजा उघडा कसा होता, आरोपीने तो कोणत्या पद्धतीने उघडला, या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे आहे. खरंतर या स्वारगेट परिसरात बस ओसाड अवस्थेत उभ्या आहेत, तसेच याठिकाणी कुणाचाही वावर नाही, याची संपूर्ण जाणीव आरोपीला होती असेच या घटनेतून दिसून येत आहे. पोलिसांनी बलात्कार पीडितेची मेडिकल चाचणी केली असून, त्याचा रिपोर्ट समोर आला आहे. त्यातून पीडितेवर दोनवेळेस बलात्कार केल्याचे समोर आले आहे. आरोपीने पीडित तरूणीला आपण वाहनचालक असल्याचे सांगत तिची मर्जी संपादन करून तिला बसमध्ये घेवून गेला. खरंतर बसमध्ये अंधार असल्यामुळे या तरूणीने संशय देखील व्यक्त केला, मात्र बसमध्ये प्रवासी झोपल्याचे सांगत या तरूणीला बसमध्ये चढण्यास आरोपीने प्रोत्साहित केले. हा संपूर्ण प्रकार होत असतांना याठिकाणी कोणताही सुरक्षारक्षक उपलब्ध नव्हता का? स्वारगेट आगारप्रमुखांनी बसस्थानकावर किती सुरक्षारक्षक नेमले होते? ही घटना घडली तेव्हा किती सुरक्षारक्षक त्यावेळेस उपस्थित होते, या बाबींची झाडाझडती घेण्याची खरी गरज आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान एका 26 वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला. खरंतर आरोपी खुले आम बलात्कार करण्यासाठी बसचा वापर करतो आणि बस स्थानकावर त्याची वाच्यता होत नाही, त्यामुळे खरंच या राज्यात महिला-तरूणी सुरक्षित आहे का? बदलापूर घटनेनंतर शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍याची व्यवस्था करण्यात आली, मात्र इतर ठिकाणी काय? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे. यानंतरचा कहर म्हणजे ठाकरे गटाचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे यांनी या स्थानकाची पाहणी केली, त्यावेळी येथील चार बसचा लॉजिंगसारखा वापर होत असल्याचा गंभीर आरोप मोरे यांनी केला आहे. तसेच याठिकाणी कंडोम देखील मोठ्या प्रमाणावर पडल्याचे देखील दिसून आले आहे. त्यामुळे स्वारगेट बसस्थाकाचे आगारप्रमुख नेमके करतात तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. बरं या चौकशीमुळे काय होईल तर, बस स्थानकावरील सुरक्षेचा आढावा घेतला जाईल, सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक मोठ्या प्रमाणावर नेमल्या जातील, मात्र इतर ठिकाणाचे काय? बदलापूरची शाळा झाली, स्वारगेटचे बसस्थानक झाले मात्र पुढील ठिकाण वेगळे असेल. नराधम वेगळा असेल, ठिकाण वेगळे आणि तरूणी दुसरी असेल, मात्र बलात्काराचे प्रकार होत असतील, जोपर्यंत ही व्यवस्था महिलांच्या सुरक्षेच्या प्रती गंभीर नाही तोपर्यंत असे बलात्कार महिलांना रोजच पचवावे लागणार आहे. त्यामुळे व्यवस्थेविरोधात उभे राहायला आणि स्वतःसक्षम व्हायलाच महिलांनी आता शिकले पाहिजे.

COMMENTS