भारताकडून शरणार्थींसाठी ई-व्हिसाची घोषणा

Homeताज्या बातम्यादेश

भारताकडून शरणार्थींसाठी ई-व्हिसाची घोषणा

नवी दिल्ली: तालिबानने ताबा घेतल्यानंतर ढासळणार्या परिस्थितीत भारतात येऊ इच्छिणार्यांसाठी भारताने आज मंगळवारी आपत्कालीन ई-व्हिसाची घोषणा केली. सर्वच ध

अवघ्या 100 तासात बनवला 100 किलोमीटरचा रस्ता
रक्ताचे नमुने बदलण्यात आईचाही सहभाग
युक्रेनमध्ये अडकलेले 182 विद्यार्थी मुंबईत दाखल

नवी दिल्ली: तालिबानने ताबा घेतल्यानंतर ढासळणार्या परिस्थितीत भारतात येऊ इच्छिणार्यांसाठी भारताने आज मंगळवारी आपत्कालीन ई-व्हिसाची घोषणा केली. सर्वच धर्माचे अफगाणी नागरिक ई-इमर्जन्सी एक्स-मिस्लेनियस व्हिसासाठी आभासी स्वरूपात अर्ज दाखल करू शकतील. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर दोन दिवसांनी उपरोक्त घोषणा करण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधील सद्यःस्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्रालयाने व्हिसा कायद्यातील तरतुदींचा आढावा घेतला. आपत्कालीन परिस्थितीत प्रवेश करण्यासाठी ई-इमर्जन्सी एक्स-मिस्लेनियस ही वेगवान व्हिसापद्धत देशात वापरली जाते, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावास बंद करण्यात आल्यानंतर व्हिसासाठी आभासी पद्धतीने अर्ज सादर करणे शक्य असून, याची छाननी दिल्लीत केली जाते, असे अधिकार्यांनी सांगितले. सुरुवातीला हा व्हिसा सहा महिन्यांसाठी वैध असतो. व्हिसासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर सुरक्षेशी निगडीत मुद्यांची छाननी केल्यानंतर अफगाणी नागरिकांना व्हिसा प्रदान केला जाणार आहे.

COMMENTS