Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनू, गुकेशसह 4 जणांना ’खेलरत्न’ तर स्वप्नील कुसाळे ’अर्जुन पुरस्कार’ने सन्मानित

नवी दिल्ली : विविध खेळांमध्ये उत्कृृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय

रिंकू सिंहच्या शॉटने खळ्ळ खट्याक प्रचंड ताकदीनं मारलेल्या सिक्सने फोडली काच
आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजला पाच पदके
दिल्लीच्या पराभवाने आरसीबी प्लेऑफमध्ये ; कर्णधार रिषभ पंत ठरला खलनायक !

नवी दिल्ली : विविध खेळांमध्ये उत्कृृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते डबल ऑलिंपिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेश, दोन वेळेचा ऑलिंपिक पदक विजेता आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तर महाराष्ट्रातील नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेश याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय पुरुष हॉकी खेळाडू जरमनप्रीत सिंग, संजय, अभिषेक आणि सुखजीत सिंग आणि महिला हॉकी संघाची कर्णधार सलीमा टेटे यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रौणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

COMMENTS