Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जोर्वे येथील दफनभूमी व अतिक्रमण हटवण्याच्या घटनेची चौकशी करावी : विद्रोही आदिवासी महासंघाची मागणी

संगमनेर : तालुक्यातील जोर्वे येथील गट क्रमांक ०७ मधील भिल्ल जमातीचा क्षेत्र 1 हेक्टर ३० आर दफनभूमीवरील सर्व अतिक्रमण 7 दिवसात काढल्या बाबत व सातब

मराठा वधू-वर मेळाव्याचे आयोजन
सहायक पोलिस निरीक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
शिक्षण उत्पादक हस्तकलेतून किंवा उद्योगातून दिले जावेः आदिनाथ सुतार

संगमनेर : तालुक्यातील जोर्वे येथील गट क्रमांक ०७ मधील भिल्ल जमातीचा क्षेत्र 1 हेक्टर ३० आर दफनभूमीवरील सर्व अतिक्रमण 7 दिवसात काढल्या बाबत व सातबारा उतारावरील दफनभूमी नाव कमी केल्याची तातडीने चौकशी होऊन फौजदारी व ॲट्रॉसिटी चे गुन्हे दाखल करावे अशी मागणी विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रांताधिकारी कार्यालय येथे आज या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विद्रोही महासंघाचे तालुकाध्यक्ष भास्कर बर्डे, संस्थापक अध्यक्ष दिलीपराव बर्डे, बबन खैरे, विलास खैरे, दत्तात्रय जावळे, भैय्या शेख ,राजू शेख, अकबर शेख, प्रशांत गायकवाड, अमोल क्षीरसागर, प्रमोद इंगळे ,अमित थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मौजे जोर्वे येथील जमीन गट क्रमांक ०७ मध्ये अनुसूचित जनजाती भिल्ल सामुदायाची दफनभूमी जमीन आहे. आदिवासी , भिल्ल समुदाय त्यांच्या रीतीरीवाजाप्रमाणे मयत झालेल्या व्यक्तींना तेथे पूर्वीपासून दफन करतात. या अगोदर आदिवासी भिल्ल समुदायाचे अनेक पार्थिव सदरच्या जमिनीमध्ये दफन केलेले आहे. मात्र मागील एक महिन्यापासून त्या दफनभूमीवर जोर्वे गावांमधील काही राजकीय पुढार्‍यांनी दहशत, दादागिरी चा वापर करून तसेच ग्रामपंचायत जोर्वे यांनी बेजबाबदारपणे ठराव घेऊन सदरच्या दफन भूमीवरील घुसखोरी करून अनाधिकृत बांधकामे केलेली आहेत तसेच आज रोजी जलजीवन योजनेच्या तळ्याचे पाणीसाठ्याचे व इतर कामे सुरू आहे. सदर दफनभूमी वरील जागेमधील वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. या बेजबाबदार गैर कृत्यांमुळे आज रोजी दफनभूमी शिल्लक राहिलेली नाही. यामुळे दफन भूमीवरील दफन शवांची अपप्रतिष्ठा केली त्यामुळे भिल्ल समाजाच्या धार्मिक भावना दुखावले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी आणि ॲट्रॉसिटी चे गुन्हे दाखल करण्यासाठी लेखी आदेश करावेत. तसेच गट क्रमांक ०७ मधील सातबारा उताऱ्यावरून भिल्ल समाजाची दफन भूमी हे नाव कोणी केले त्याची सात दिवसांमध्ये चौकशी करून त्या चौकशीचा अहवाल निवेदन करते यांना लेखी स्वरूपात कळवावा. सदर प्रकरणी हेतूपूर्वक टाळाटाळ झाल्यास अथवा प्रस्तुत प्रकरणी यथायोग्य चौकशी न झाल्यास सात दिवसानंतर कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

COMMENTS