Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतून वंदे भारत स्लीपरची यशस्वी चाचणी

मुंबई : अलीकडेच अमृत भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. भारतीय रेल्वेत अनेक मसुधारणा होत असल्याचे दिसत आहे. भारतीय रेल्वेचा संक्रमणाचा

विहिंप व समरसता मंच पदाधिकारी पोहोचले अशोक गायकवाडांच्या घरी
तलाठी भरती परीक्षेचा घोळ संपेना
गलितगात्र काँग्रेस !

मुंबई : अलीकडेच अमृत भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. भारतीय रेल्वेत अनेक मसुधारणा होत असल्याचे दिसत आहे. भारतीय रेल्वेचा संक्रमणाचा आणि कात टाकण्याचा काळ आहे. कारण बुधवारी वंदे भारताची स्लीपर रेल्वेची ट्रायल यशस्वीपणे पार पडली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकावर आज अहमदाबाद ते मुंबई अशी वंदे भारत स्लीपरची ट्रायल रन घेण्यात आली. भारताची नव्या रुपाची प्रिमियम ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत आता लवकरच धावण्यास सज्ज झाली होणार आहे आणि तिची चाचणी सध्या सुरू आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन आता स्लीपर बर्थच्या रुपात येणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना आता प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी अंतिम टप्प्यात असून चाचणी दरम्यान तब्बल 130 ताशी वेगाने वंदे भारत स्लीपर अहमदाबाद ते मुंबई धावली.

COMMENTS