पुणे : भारतीय लष्कराने 15 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रात पुणे येथे बॉम्बे इंजिनीअर्स ग्रुप आणि केंद्रीय संचलन मैदान येथे 77 वा सेना दिवस साजरा क
पुणे : भारतीय लष्कराने 15 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रात पुणे येथे बॉम्बे इंजिनीअर्स ग्रुप आणि केंद्रीय संचलन मैदान येथे 77 वा सेना दिवस साजरा केला. हा प्रतिष्ठित कार्यक्रम देशाच्या इतर भागात आयोजित करण्याच्या निर्णयानुसार सेना दिवस संचलन दिल्लीबाहेर आयोजित करण्याचा हा तिसरा प्रसंग आहे. लष्कराच्या दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली संचलन आयोजित करण्याची ही दुसरी वेळ असून पहिल्यांदा 2023 मध्ये बंगळुरूमध्ये सेना दिवस संचलन आयोजित करण्यात आले होते. युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून संचलनाची सुरुवात झाली, यावेळी लष्कर प्रमुख (COAS) जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला विविध लष्करी आणि नागरी मान्यवर उपस्थित होते यामध्ये संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणि, दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, जनरल ऑफिसर कमांडिंग, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र, जनरल पवन चढ्ढा, इतर मान्यवर आणि परदेशी अतिथी उपस्थित होते.
COMMENTS