Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी सर्व समान्यांना दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसाय

गाझापट्टीवरील धुमश्‍चक्रीत 1600 जणांचा मृत्यू
नितेश राणेंचा मुंबईच्या पालिका आयुक्तांना इशारा | LOKNews24
संगमनेर तालुक्यात 2933 लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले जमा

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी सर्व समान्यांना दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडर दरात कपात केली आहे. त्यामुळे व्यावसायिक वापराचे सिलेंडर 14 ते 16 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. दरम्यान घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन किंमती आज, बुधवारी जाहीर झाल्या आहेत. आयओसीएलच्या वेबसाईटवर अपडेट केलेल्या किंमतीनुसार, राजधानी दिल्लीत 1 जानेवारीपासून एचपीजी सिलिंडरची किंमत आता 1804 रुपये झाली आहे. पूर्वी दिल्लीत कमर्शिअल सिलेंडरचे दर 1818.50 रुपये होतो. त्यात आता 14.50 रुपयांची घट झाली आहे. तर कोलकाता येथे सिलेंडर 16 रुपयांनी आणि मुंबईत 15 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

COMMENTS