Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संतोष देशमुखांना मारहाण करतेवेळी फोन करणारा तो बडा नेता कोण ? : दमानिया

मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचे पडसाद राज्यभर उमटतांना दिसून येत आहे. शनिवारी बीडमध्ये मूक मोर

शेतीत काम करतानाचा अभिनेते प्रवीण तरडेंचा Video व्हायरल.
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मका पिकाची मोठ्या प्रमाणात आवक
‘त्या’ ८ चित्त्यांचं नामकरणं; मोदींनी ठेवलं खास नाव !

मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचे पडसाद राज्यभर उमटतांना दिसून येत आहे. शनिवारी बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आल्यानंतर रविवारी वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ ट्विट करत संतोष देशमुख याला मारहाण होताना कोणत्या बड्या नेत्याचा फोन आला होता अशी विचारणा करत तत्काल नाव जाहीर करण्याची मागणी केली आहे.
दमानिया त्यांच्या व्हिडीओमध्ये पुढे म्हणतात, संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपास करणार्‍या सीआयडी पथकाला स्कॉर्पियो गाडीमधे 2 मोबाईल मिळाले आहेत, त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येत आहे. त्यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आहेत. पण, एका बड्या नेत्याचा फोन गेला होता, हे देखील आहे. कोण आहे हा बडा नेता, तत्काळ नाव जाहीर करा अशी मागणी अंजली दमानया यांनी केली आहे. दमानिया यांनी केलेल्या या ट्विटमुळे तपासाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच बीड पोलिस, सीआयडी तसेच राजकीय नेते या बड्या नेत्याचे नाव जाहीर करणार का? तसेच फोन कोणी केला होता याची माहिती पोलिस शोधून काढणार का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. दरम्यान, फरार आरोपींची संपत्ती जमा करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र, त्यात वाल्मीक कराडचे नाव आहे की नाही? याची स्पष्टता त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे वाल्मीक कराडची संपत्ती जप्त होणार की नाही? असा सवाल अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना केला आहे. तसेच अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती त्यांना पुन्हा वरदान म्हणून देण्यात आली, तशीच फरार आरोपींची जप्त झालेली संपत्ती तुम्ही पुन्हा देणार असाल, तर हे चालणार नाही, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला.

बीड पोलिसांची अंजली दमानियांना नोटीस
सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्येप्रकरणातील आरोपींची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता, याप्रकरणी बीड पोलिसांनी दमानिया यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. फरार आरोपींच्या संदर्भात जो दावा केला, त्याचे स्पष्टीकरण द्यावे, अशा सूचना पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये करण्यात आल्या आहेत. अंजली दमानिया यांनी फरार आरोपींच्या संदर्भात जो मृत्यूचा दावा केला, त्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे करण्यात आल्या आहेत. बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी अंजली दमानिया यांना नोटीस बजावली आहे. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे द्यावे, असे नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS