Homeताज्या बातम्यासंपादकीय

न्यायाचा लढा प्रत्येक अत्याचारात हवा !

  प्राजक्ता माळी प्रकरणामध्ये आता अनेक जणांनी उड्या घेतल्या आहेत. सर्वात प्रथम, प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांचे विरोधात जो आक्षेप घेतला आहे,

तिसरी फेरीतही भाजप आघाडीचा संकोच !
आता कर्नाटकचेही शैक्षणिक धोरण !
….तर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नैतिक बळच हरवेल!

  प्राजक्ता माळी प्रकरणामध्ये आता अनेक जणांनी उड्या घेतल्या आहेत. सर्वात प्रथम, प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांचे विरोधात जो आक्षेप घेतला आहे, तो हाच आहे की, एखाद्या इव्हेंटमध्ये पुरुष कलाकारही असताना, त्यांची नावे न घेता केवळ महिला कलाकारांची नावे काढली, हा त्यांचा सरळ प्रश्न होता. त्यामुळे हे नाव घेण्यामागेच एक कुत्सित हेतू आहे, असा त्यांचा एक प्रकारे आरोप आहे. या विरोधात काही लोकांनी प्राजक्ता माळी या संघाच्या आहेत आणि संघाची विचारसरणी महिलांविरुद्ध आहे, असा आरोप करित आहेत. वास्तविक,  कलाकार हा व्यक्ती असतो. व्यक्ती म्हणून त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि महिला म्हणून स्त्री ची प्रतिष्ठा ही फार महत्त्वाची असते. कोण, कोणत्या विचारांच्या संघटनेत काम करते, हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. परंतु, एखाद्या संघटनेच्या विचारधारा अशी आहे म्हणून, त्यांना त्यांच्या इभ्रतीसाठी लढण्याचा अधिकार नाही का? हा प्रश्न खरे तर विचारला गेला पाहिजे. अर्थात ज्या साहसाने प्राजक्ता माळी यांनी आपली भूमिका मांडली आहे, त्याबद्दल त्यांचे निश्चित अभिनंदन करावे लागेल. महाराष्ट्रात स्त्री प्रतिष्ठा ही नेहमी जपली जाते. त्यामुळे, स्त्रियांच्या संदर्भात बेताल वक्तव्य कोणी केलं तर त्यांनी माफी मागण्याची ही तयारी दाखवली आहे; किंबहुना, अनेक वेळा माफी मागितल्या गेल्या आहेत. परंतु, या प्रकरणामध्ये ज्यांनी प्राजक्ता माळी यांच्या विषयी जो काही उल्लेख केला आहे, त्याबद्दल मी माफीच मागणार नाही, अशी जी भूमिका घेतली आ,हे ती, महाराष्ट्राच्या परंपरेला साजिशी नाहीच! त्यामुळे, कोणतेही प्रकरण हाताळताना केवळ झुंडशाहीच्या बळावर  हाताळणे हे महाराष्ट्रामध्ये कधीही घडत नाही. प्राजक्ता माळींच्या संदर्भात प्रश्न विचारणाऱ्या अनेकांना आम्ही आठवण करून देऊ इच्छितो, यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक हत्याकांड घडवली गेली आहेत. त्या विरोधात किती लोक मोर्चामध्ये सामील झाले? राजकीय डावपेचांची लढाई असते, त्यावेळी अशी लोक सामील होतात! परंतु, या महाराष्ट्राची अनेक प्रकरणे आहेत, ज्याच्यामध्ये आजही न्याय मिळालेला नाही. अशा न्यायप्रविष्ठ सामाजिक अत्याचाराची प्रकरणे जर आम्ही बाहेर काढली तरी, त्यांची संख्या किती प्रचंड होईल आणि ती महाराष्ट्राच्या भूमीवर गेली साठ वर्षे सातत्याने घडलेली आहे. त्यामुळे, एखाद्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील सगळी जनता एकाच शहरात जर जमत असेल तर, या जमलेल्या समूहाने आजपर्यंत महाराष्ट्रात झालेले जे सामाजिक अत्याचार आहे, त्यांच्या संदर्भात कधीही मोर्चे काढले नाहीत; याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी जर मागणी केली तर?  राजकीय उद्देशाने प्रेरित असलेले  हे माफी मागणार आहेत का?  व्यक्ती आणि समूह कोण आहे हे पाहून जेव्हा न्यायाचे लढे होतात, तेव्हा त्यांची  नियती न्यायाची असते का? काय त्यांना न्यायाची चाड आहे? ते कोणत्याही प्रकरणात हिरिरीने उतरतात का? न्यायाची बाजू पाहता गेली साठ वर्षे या महाराष्ट्रात अखंडपणे सामाजिक अत्याचार घडलेले आहेत. अशा सामाजिक अत्याचारांच्या काळामध्ये हे न्यायासाठी आसुसलेले लोक कुठे लपून बसले होते? हा महाराष्ट्र समोरचा प्रश्न आहे. त्यामुळेच, आज ज्या पद्धतीने सगळेजण न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत, ती न्यायाची लढाई महाराष्ट्रात त्यांनी अनेक प्रकरणात दाखवावी! त्यांची तयारी असेल तर आम्ही त्या प्रकरणांची आठवण त्यांना निश्चितपणे करून देऊ! त्या प्रकरणावर त्यांनी सामूहिकपणे महाराष्ट्राच्या कुठल्याही एका शहरात मोर्चा काढून अत्याचाऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी करावी, असं त्यांना जाहीर आव्हान करतो!  एखाद्या प्रकरणामधील राजकीय पध्दतीने  वाद उभा केला जातो; तेव्हा, त्यामागे न्यायाची नीती राहत नाही. तर, आपल्या जातीय दडपणाची एक अहमहमिका असते.  हीच अहमहमिका त्यांना लढ्यासाठी प्रवृत्त करते. परंतु, लढा न्यायाचा आहे की जातीय दडपणाचा,  हा खरा प्रश्न महाराष्ट्र समोर आला. कोणत्याही अत्याचाराच्या विरोधात न्याय मिळवणे ही बाब १००% सत्य आहे आणि योग्य आहे. परंतु, एखाद्या स्त्रीचा अनुचित उल्लेख करूनही माफी मागण्यास नकार देणे म्हणजे, महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेशी विसंगत वर्तन आहे, असा आम्ही निश्चितपणे मानतो..

COMMENTS