पुणे : पुण्यात सोमवारी पहाटे झालेल्या अपघातात फुटपाथवरील 9 जणांना डंपरचालकाने चिरडल्याची घटना घडली असून, यात तिघांचा मृत्यू झाला असून इतर जखमी आह
पुणे : पुण्यात सोमवारी पहाटे झालेल्या अपघातात फुटपाथवरील 9 जणांना डंपरचालकाने चिरडल्याची घटना घडली असून, यात तिघांचा मृत्यू झाला असून इतर जखमी आहेत. हा अपघात वाघोली परिसरात डंपर चालकाने हा अपघात केला आहे. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातात 9 जणांना चिरडले आहे. यामध्ये दोन लहान मुले असल्याची माहिती मिळाली आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघातात विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती, वैभवी रितेश पवार-वय-1, वैभव रितेश पवार वय 2 या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर यासोबतच जानकी दिनेश पवार, 21 वर्षे, रिनिशा विनोद पवार 18, रोशन शशादू भोसले, 9 वर्षे, नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे, दर्शन संजय वैराळ, वय 18,आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे हे सहाजण जखमी झाले आहेत. याबाबात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केसनंद फाट्यावरील फूटपाथवर 12 लोकं झोपलेले होते. तर बाकी फूटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते. मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकाचे भरधाव डंपरील नियंत्रण सुटल्याने तो सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्या लोकांच्या अंगावर गेला. आणि नऊ जणांना चिरडले. या भीषण अपघातात फूटपाथवर झोपलेल्यांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
COMMENTS