Homeताज्या बातम्या

पूजा खेडकरला होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक ; यूपीएससी करणार स्वतंत्र गुन्हा दाखल

नवी दिल्ली : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि बेकायदेशीरपण

जिल्ह्यातील 67 हजार दूध उत्पादक शेतकर्‍यांना 61 कोटींचे अनुदान
ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने शेतकरी चिंतेत
शेतकर्‍यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व ः थोरात

नवी दिल्ली : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि बेकायदेशीरपणे ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पूजा खेडकरचे आयएएस पद देखील काढून घेतले होते. तसेच तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याअटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी तिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सोमवारी 23 डिसेंबर रोजी तिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे, त्यामुळे तिची अटक अटळ असल्याचे बोलले जात आहे.
यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर विरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला होता. अटक टाळण्यासाठी पूजाने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती चंदर धारी सिंह यांच्या खंडपीठाने 27 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी निर्णय राखून ठेवला होता यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. पूजावरील आरोप गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. संपूर्ण कटाचा उलगडा होण्यासाठी आणि त्यात इतर लोकांचा सहभाग असल्याची पुष्टी करण्यासाठी त्यांच्या कोठडीत चौकशीची गरज आहे. यूपीएससीने खोटी साक्ष खटला मागे घेतला आणि स्वतंत्र केस दाखल करणार असल्याचे सांगितले. यूपीएससीने पूजावर न्याय व्यवस्थेत फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आणि खोटे प्रतिज्ञापत्र देऊन खोटी साक्ष देण्याचा आरोपही केला आहे.

COMMENTS