Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीन दिवसांनी 15 वा मृतदेह सापडला

मुंबई :मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणार्‍या नीलकमल बोटीच्या अपघाताचा शनिवारी चौथा दिवस होता. मात्र, तरीही बोट अपघातात बुडालेल्या मृता

समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार
विजय दर्डा यांच्यासह तिघांना जामीन मंजूर
रुग्णवाहिकाचा लोकार्पण सोहळा (Video)

मुंबई :मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणार्‍या नीलकमल बोटीच्या अपघाताचा शनिवारी चौथा दिवस होता. मात्र, तरीही बोट अपघातात बुडालेल्या मृतांचा शोध अद्याप सुरुच आहे. शनिवारी सकाळी मिसिंग असलेल्या 15 व्या मृताचा देखील शोध लागला आहे. मुंबई पोलिस आणि नेव्हीसह एजंन्सीने या घटनेचा शोध लावला आहे. यामध्ये 15 व्या मृत व्यक्तीचा शोध लागला आहे. मुंबई किनारपट्टीवर बोट आणि नौदलाचे जहाज यांच्यात झालेल्या धडकेने बेपत्ता झालेल्या सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शनिवारी सकाळी सापडला. या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांनी माहिती दिली आहे.

COMMENTS