Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रवींद्र वायकर खासदार म्हणून कायम ; अमोल कीर्तीकरांची निवडणूक याचिका फेटाळली

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला होता. तर ठाकरे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा अवघ

डॉ. आंबेडकरांचे कार्य कधीही विसरता येणार नाही : पंतप्रधान
800 Gram वजनाचं Baby जन्मलं, आणि …
प्रफुल्ल पटेल लोकसभेसाठी इच्छुक

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला होता. तर ठाकरे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा अवघ्या 48 मतांनी विजय झाला होता. याप्रकरणी अमोल कीर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र गुरूवारी हा याचिका फेटाळण्यात आल्यामुळे वायकर यांची खासदारकी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कीर्तीकर यांची याचिका ऐकण्यायोग्य नाही. याचिकेची मांडणी योग्यरित्या करण्यात आलेली नाही. तसेच टेंडर मते ही विजयी उमेदवाराला कशी मिळाली हे दाखविण्यास कीर्तीकर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे, त्यांची याचिका फेटाळून लावावी हा वायकर यांच्यावतीने करण्यात करण्यात आलेला दावा न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने योग्य ठरवला. तसेच, कीर्तीकर यांची याचिका फेटाळली. दरम्यान, मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान 120 टेंडर मते गहाळ झाली असून त्यांची मोजणी झालेली नाही. एकूण 333 टेंडर मते होती. त्यापैकी 120 टेंडर मते मोजली गेली नाहीत. टेंडर मतांच्या फेरमोजणीची विनंती केली होती, पण ती नाकारण्यात आल्याचा दावा, कीर्तीकर यांच्यातर्फे युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला होता.

COMMENTS