नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात पंतप्रधान मोदी, अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याच्या तर, दिल्लीतील शाळा बॉम्बने उडवून देण्याच्या,

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात पंतप्रधान मोदी, अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याच्या तर, दिल्लीतील शाळा बॉम्बने उडवून देण्याच्या, यासोबतच विमानात बॉम्ब ठेवण्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती, त्यानंतर मात्र या अफवा असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी केंद्र सरकारने बुधवारी बॉम्बची खोटी माहिती देणार्यास 1 कोटी रूपयांपर्यंतच दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे आता खोट्या बातम्या पसरवणार्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. त्यानुसार, 9 डिसेंबरनंतर कोणत्याही विमान कंपनीत बॉम्बची खोटी माहिती देणार्याला 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. 2024 या एका वर्षात 1 हजाराहून अधिक वेळा खोट्या धमक्या दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचे आर्थिक नुकसान झाले. सोबतच प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने मोठा दंड आकारण्याची तयारी केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एक कोटीपर्यंतचा दंड ठोठावण्याची घोषणा केली आहे.
COMMENTS