Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेत्यांसह देवेंद्र फडणवीसांवर एकही टीकेची संधी सोडली न

‘योग दिना’ला कट्टरपंथीयांची दहशत; व्हिडीओ व्हायरल | LokNews24
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स स्पर्धेसाठी निवड
इस्लामपूर बाजार समिती निवडणुकीत 49 जणांची माघार; राष्ट्रवादी विरूध्द शेतकरी परिवर्तन पॅनेलमध्ये थेट लढत

नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेत्यांसह देवेंद्र फडणवीसांवर एकही टीकेची संधी सोडली नाही. एकतर तू राहशील किंवा मी राहशील असा निर्वाणीचा इशारा देखील दिला होता. मात्र मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा देखील झाली. यावेळी, आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि वरुण सरदेसाई हेही उपस्थित होते. एकीकडे भाजपकडून शिवसेना एकनाथ शिंदेंना दाबले जात असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून उद्धव ठाकरे देखील आज विधिमंडळात आले होते. नागपूरमध्ये येताच सर्वप्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर व महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. लाडकी बहीण योजना, मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजी, ईव्हीएम, निवडणूक आयुक्त यांसह विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून भाष्य केले. त्यानंतर, ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. उद्धव ठाकरेंची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून शिंदे गटातील नेत्यांमध्ये देखील या भेटीने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

COMMENTS