Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंबेडकरी व संविधानप्रेमींकडून आज महाराष्ट्र बंदची हाक

परभणी : परभणी जिल्ह्यात झालेल्या दगडफेक प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरूणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

मद्यपी पोलिसांची नागरिकांना मारहाण | LOKNews24
लसीकरणामुळे 15 वर्षीय मुलीचा मृत्यू | LOKNews24
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन नाहीच

परभणी : परभणी जिल्ह्यात झालेल्या दगडफेक प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरूणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. परभणीच्या या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती असून, आंबेडकरी व संविधानवादी जनतेने आज’महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत नांदेड पोलिस महानिरीक्षक शाहजी उमाप पुन्हा परभणीत दाखल झाले आहेत. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या काहीही स्पष्ट नाही. या तरुणाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर 50 जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी याचा कारागृहात मृत्यू झाला.

आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत : आनंदराज आंबेडकर
परभणीत झालेल्या घटनेनंतर रिपब्लिकन सेनेच्या वतीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. परभणीत आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे व्हावेत, अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी, अमानुष अत्याचार करणार्‍या पोलिसांवर कारवाई करावी, शाहिद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, या मागण्या सरकारसमोर केल्या जाणार आहेत.

वंचितचे नेते अ‍ॅड. आंबेडकरांचा संताप
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सोमनाथ सुर्यवंशी असून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी त्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले आहेत की, परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला आहे, हे अत्यंत वेदनादायक, भयानक आणि असह्य करणारे आहे. त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला, याहून असहनीय काय असेल, मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने, आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम (सीटी स्कॅन, एमआरआय, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिकल) फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयामध्ये केले जावे आणि फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांकडून पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण केले जावे. याबरोबरच आंबेडकर यांनी आम्ही न्यायासाठी लढू!, असेही म्हटले आहे.

COMMENTS