बाजार समितीतून ढवळपाटी येथे कोरोना केअर सेंटर उभारणार : श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

Homeमहाराष्ट्रसातारा

बाजार समितीतून ढवळपाटी येथे कोरोना केअर सेंटर उभारणार : श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

फलटण तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या विशेष करून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर ढवळपाटी येथे फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधा युक्त असे 100 बेडचे कोरोना केअर सेंटर उभारणार असल्याची माहिती यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

लातूरमध्ये अवकाळीचा कहर, वीज पडून एकाचा मृत्यू
Solapur : मंद्रुप महावितरणचा भोंगळ कारभार (Video)
भाजप खासदार उन्मेष पाटलांनी बांधले शिवबंधन


फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या विशेष करून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर ढवळपाटी येथे फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधा युक्त असे 100 बेडचे कोरोना केअर सेंटर उभारणार असल्याची माहिती यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले, ढवळपाटी येथे उभा करण्यात येणार्‍या कोरोना केअर सेंटरमध्ये प्रामुख्याने सर्व सोयी-सुविधा रुग्णांना पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने 10 ऑक्सिजन बेड, 2 व्हेंटिलेटर बेड तसेच रुग्णांच्या मनोरंजनासाठी एलईडी टी. व्ही. उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कोरोना केअर सेंटर मध्ये तज्ञ डॉक्टरांची टिम व 10 नर्सेस रुग्णांची देखभाल करणार असल्याचे  असल्याचे सांगून श्रीमंत रघुनाथराजे म्हणतात की, युवा नेते श्रीमंत विश्‍वजितराजे यांच्या पंचायत समिती मतदार संघांमध्ये असणारे ही कोरोना केअर सेंटरवर विशेष करून श्रीमंत विश्‍वजीतराजे यांचे लक्ष राहणार आहे. तसेच त्यांच्या माध्यमातून रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी व म्युकर मायकोसिस या आजाराचा धोका टाळण्यासाठी विशेष करून मार्गदर्शन ही केले जाणार असल्याचेही श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले आहेत. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून लवकरच फलटणमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येणार असून या हॉस्पिटलच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर आरोग्यविषयक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ही शेवटी श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले आहेत.

COMMENTS