Homeताज्या बातम्यादेश

अभिनेता अल्लू अर्जुनला अटकेनंतर जामीन

हैदराबाद :अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा-2 चित्रपट सध्या सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालतांना दिसून येत आहे. यातच एका सिनेमागृहात झालेल्या चेंगराच

मुंबईत तीन दिवसापासून पावसाचा जोर कायम
औंधच्या तनपुरे कुटुंबियांकडून गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम
बजरंग दल व दुर्गावाहिनीकडून गणरायाचे निर्विघ्न विसर्जन

हैदराबाद :अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा-2 चित्रपट सध्या सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालतांना दिसून येत आहे. यातच एका सिनेमागृहात झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी पोलिसांनी अटक केले, त्यानंतर अवघ्या काही तासात त्याला उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात आला. कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेता अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला. यापूर्वी हैदराबाद न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
या अभिनेत्याला शुक्रवारी सकाळी 12 वाजता त्याच्या घरातून अटक करण्यात आली. यानंतर 4 वाजता त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर अभिनेत्याने उच्च न्यायालयात अपील केले. हायकोर्टाने पाच वाजता जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयात अल्लूच्या वकिलाने बचावात शाहरुखच्या चित्रपट रईस प्रकरणाचा उल्लेख केला. तो म्हणाला, ’गुजरातमध्ये एका प्रमोशनदरम्यान खानने गर्दीवर टी-शर्ट फेकले होते. यानंतर चेंगराचेंगरी झाली. या प्रकरणात अभिनेत्यावर निर्दोष हत्येचा आरोप होता. गुजरात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने शाहरुखला दिलासा दिल्याचे वकिलाने सांगितले, त्यानंतर अल्लू अर्जुनला जामीन देण्यात आला. संध्या चित्रपटगृहामध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या रिलीजदरम्यान मोठा जमाव एकत्र आला होता. यावेळी चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. पोलिसांनी यापूर्वी संध्या चित्रपटगृहाचे व्यवस्थापन, अभिनेता आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अधिकार्‍यांनी नमूद केले की त्यांना कार्यक्रमात अभिनेत्याच्या उपस्थितीबद्दल आगाऊ माहिती देण्यात आली नव्हती. शुक्रवारी, चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनच्या पथकाने, जिथे गुन्हा दाखल केला होता, त्यांनी अर्जुनला अटक केली होती.

COMMENTS