Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महाराष्ट्रासह पाच राज्यात छापे

मुंबई :राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने गुरूवारी महाराष्ट्रात इतर पाच राज्यात छापे टाकल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे. ही कारवाई दहशतवादी संघटनां

Ahmednagar : टिंग्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश | LOKNews24
दलित पँथरने दिला डॉ. सुजय विखे यांना जाहीर पाठिंबा
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सतीश गर्जे यांची नियुक्ती

मुंबई :राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने गुरूवारी महाराष्ट्रात इतर पाच राज्यात छापे टाकल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे. ही कारवाई दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून करण्यात आल्याचे समोर आले आहे. जम्मू-काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील 19 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अमरावती आणि भिवंडीमध्ये एनआयएने छापे टाकले. राज्यातील कारवाईमध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकदेखील आहे. दहशतवादी संघटनांचा प्रचार आणि प्रसार रोखणे, अतिरेकी संघटनांमध्ये भारतीय युवकांना सामिल होण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या चौकशी सुरू असलेल्या संशयितांनी तरुणांना कट्टरतावादी बनवून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेत कसे सामिल केले, याचा तपास एनआयएकडून सुरू आहे. एनआयएने अमरावतीमधील छायानगरमध्ये छापा मारला. एनआयएने या कारवाईत एकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा 35 वर्षीय युवक असल्याची माहिती आहे. या तरुणाचा संबंध पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदशी असल्याचा संशय आहे.

COMMENTS