Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस-अदानीमध्ये खलबते

मुंबई :राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर महायुती सरकारचे कामकाज सुरू झाले आहे. त्य

तुमचे आजचे राशीचक्र, बुधवार ३० जून २०२१ l पहा LokNews24
आयुषमान खुरानाच्या वडिलांचं निधन
सांगलीत लम्पीचा धोका वाढला

मुंबई :राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर महायुती सरकारचे कामकाज सुरू झाले आहे. त्यातच मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची सागर बंगल्यावर उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट घेतली. राज्यातील उद्योगांच्या विकासासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली असून सुमारे दीड तास खलबते झाल्याचे समोर आले आहे.
दोघांमध्ये नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली, याचा अधिकृत तपशील समोर आला नसला तरी, धारावी प्रकल्पासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण धारावी हा एक महत्त्वाचा प्रकल्प गौतम अदानी यांचा आहे. धारावी प्रकल्पावरून विरोधकांनी देखील गौतम अदानी यांच्यावर निवडणुकांच्या प्रचार काळात जोरदार टीका केली होती. याच धारावी प्रकल्पासंदर्भात देखील चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS