Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. खताळ यांच्या माध्यमातून तळेगावचा पाणी प्रश्न सुटला

संगमनेर : संगमनेर विधानसभेच्या आमदारपदी  निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या कामाचा श्रीगणेशा तळेगाव शिवारातील भागवतवाडी येथील गायत्री प्रोजेक्ट कंपनीच

संत भगवान बाबांचे विचार समाजाला प्रेरणादायी – आ. संग्राम जगताप
कोपरगाव शहरात वाढले चोर्‍याचे प्रमाण
नगरला धोका ठरणारा पाझर तलाव होणार दुरुस्त ; हिवरे बाजारच्या प्रस्तावास मान्यता

संगमनेर : संगमनेर विधानसभेच्या आमदारपदी  निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या कामाचा श्रीगणेशा तळेगाव शिवारातील भागवतवाडी येथील गायत्री प्रोजेक्ट कंपनीचा तलाव तळेगावकरांसाठी खुला करून देत केला. त्यामुळे या गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील भागवतवाडी येथे गायत्री प्रोजेक्ट कंपनीचा तलाव निळवंडे डाव्या कालव्याच्या पाझराचे पाणी जमा झाले आहे. सद्यस्थितीला या तलावात  ४० ते ५० हजार कोटी लिटर पाणी आहे. हे पाणी तळेगावकरांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी तळेगावचे सरपंच मयूर दिघे यांनी शिवसेनेचे नूतन आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली. त्यानुसार आ. खताळ यांनी समक्ष त्या प्रोजेक्टवर जाऊन अधिकाऱ्यांसमवेत त्या तलावाची पाहणी केली. या प्रोजेक्टच्या तळ्यातील पाणी तळेगावकरांना देण्यात यावी अशी विनंती आमदार खताळ यांनी शेतकरी सोमनाथ दिघे व गोरख दिघे यांना केली. तळेगावकरांचा पाणी प्रश्न गंभीर आहे याची आम्हाला जाण आहे, त्यामुळे या प्रोजेक्टच्या तलावातील पाणी देण्यास आमची कुठलीही हरकत नाही, असे आ. खताळ यांच्या समक्ष सांगितले. त्यानंतर या कामाचा श्रीगणेशा आ. खताळ यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. तलावातील पाणी तळेगावकरांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सोमनाथ दिघे व गोरख दिघे व गायत्री प्रोजेक्ट कंपनीचे मॅनेजर सुधीर शेळके यांचा आ खताळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी तहसीलदार धीरज मांजरे, गट विकास अधिकारी अनिल नागणे, जीवन प्राधिकर याचे कार्यकारी रवींद्र महाजन, उपअभियंता थिटे, शैलजा उपअभियंता श्रीरंग गडदे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहायक प्रमोद राहणे, तळेगावचे सरपंच मयूर दिघे,  भाजप नेते अमोल दिघे, शिवसेनेचेतालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, गणेश दिघे,आर पी दिघे माजी सरपंच तात्याभाऊ दिघे, राव साहेब दिघे, रामदास दिघे, उत्तम दिघे, निलेश दिघे, रामदास दिघे, दत्तात्रय दिघे, रोहित शिंदे, सरपंच तात्यासाहेब दिघे, श्रावण कांदळकर, यांच्यासह तळेगाव व भागवत वाडी परिसरातील कार्यकर्ते  उपस्थित होते.

COMMENTS