Homeताज्या बातम्यादेश

राजधानीतील शेतकर्‍यांचा मोर्चा तूर्तास स्थगित

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानांच शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतक

परतीच्या पावसाने वाघवाडी परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, जामगावला जोरदार पाऊस
राहुरी तालुक्यात ऊस पिकावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव
सोलापुरातील एनटीपीसी केंद्राकडून 525 मेगावॅटची वीजनिर्मिती सुरू

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानांच शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या या दिल्ली मोर्चात 10 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार होत्या. मात्र उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांचा दिल्लीकडे जाणारा मोर्चा आठवडाभरासाठी थांबवण्यात आला आहे.
ग्रेटर नोएडा, नोएडा आणि यमुना प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसोबत शेतकरी नेत्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तत्पूर्वी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स शेतकर्‍यांनी तोडल्याने मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दलित प्रेरणास्थळावर आठवडाभर थांबणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. आठवडाभरात काही गोष्टी मान्य न झाल्यास आम्ही पुन्हा दिल्लीला जाऊ. यानंतर नोएडा एक्स्प्रेस वेवरून बॅरिकेडिंग हटवण्यात आले असून यातायात सुरू झाली आहे. या कालावधीत मार्चमध्ये शेतकर्‍यांची संख्या 50 हजारांच्या वर जाऊ शकते. संसदेला घेराव घालणे हे शेतकर्‍यांचे उद्दिष्ट असून यासाठी सोमवारी दुपारी 12 वाजता नोएडा येथील महामाया उड्डाणपुलाजवळ एकत्र आल्यानंतर शेतकर्‍यांनी दिल्लीकडे कूच केली होती.

COMMENTS