Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

7 नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ : आ.आशुतोष काळे

कोपरगाव : पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांचे रब्बी हंगाम 2024-25 साठी 7 नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी केलेल्या सूचनेवरून

आयुष्याचा अंतिम हेतू समाधान हाच आहे – डॉ. संजय कळमकर
गौतम बँकेच्या सभासदांना 15 टक्के लाभांश ः आ.आशुतोष काळे
कर्जत तालुक्यातील खेड गावामधील गरीब कुटुंबातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना गावगुंडाकडून मज्जाव.

कोपरगाव : पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांचे रब्बी हंगाम 2024-25 साठी 7 नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी केलेल्या सूचनेवरून लाभधारक शेतकर्‍यांना 05 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल न केलेल्या उर्वरित लाभधारक शेतकर्‍यांनी आपले 7 नंबर पाणी मागणी अर्ज तातडीने दाखल करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी रब्बी हंगाम 2024-25 साठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात येवून रब्बी हंगामातील पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून डाव्या-उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर आवर्तन देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार 14 नोव्हेंबर पर्यंत पाणी मागणी अर्ज भरणे लाभधारक शेतकर्‍यांसाठी बंधनकारक होते. परंतु हि मुदत संपल्यामुळे काही लाभधारक शेतकरी मात्र आपले अर्ज मुदतीच्या आत दाखल करू शकले नाहीत. त्यामुळे लाभधारक शेतकर्‍यांचे नुकसान होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला 7 नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाकडून 05 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही जे लाभधारक शेतकरी आपला पाणी मागणी अर्ज दाखल करू शकले अशा शेतकर्‍यांनी आपले अर्ज सबंधित विभागाकडे तातडीने दाखल करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

COMMENTS