जामखेड : भारतीय संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाचा आत्मा आहे व संविधान दिन प्रत्येक गावागावात वाड्या वस्त्यांमध्ये. गावामध्ये साजरा करण्यात आला पा
जामखेड : भारतीय संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाचा आत्मा आहे व संविधान दिन प्रत्येक गावागावात वाड्या वस्त्यांमध्ये. गावामध्ये साजरा करण्यात आला पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी संविधान दिनाचा उत्सव मनापासुन साजरा केला पाहिजे. असे प्रतिपादन खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी केले.
मंगळवारी खर्डा येथे ग्रामिण विकास केंद्र संचालित भटके विमुक्त संसाधन केंद्र खर्डाच्या माध्यमातून संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच संजीवनीताई पाटील, डॉ बिपीन लाड, डॉ तानाजी राळेभात आदी मान्यवर होते. यावेळी संजीवनी पाटील म्हणाल्या की, प्रत्येक महिलांना सन्मानाची वागणूक देणारं ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे. डॉ. तानाजी राळेभात, डॉ. बिपिन चंद्र लाड, शिक्षक अमर भैसडे, संतोष चव्हाण यांनी संविधाना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच शंभूराजे इंगळे या छोट्या मुलांनेही संविधानावर छान भाषण केले. यावेळी सोनमताई धिवर म्हणाल्या की, संविधान प्रत्येक नागरिकाच्या मना मनात रुजवलं पाहिजे. या कार्यक्रमाचे संविधान प्रचारक नीता इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रस्तावना विशाल पवार यांनी केली. कार्यक्रमाचे आभार मंगल शिंगण उव उर्मिला कवडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी भीमराव सूरवसे, गणपत कराळे, रेश्मा बागवान, आशा टेपाळे, सविता खरात, रेखा खटावकर, शालन आरुणे, गोदावरी नाईक, अर्चना जावळे, हुसेन मदारी, फकीर मदारी, इत्यादी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 30 डोमासाईल, 50 जातीचे दाखले भटके विमुक्त समाजातील लोकांना वाटण्यात आले. हा संविधान दिन ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके विमुक्त संसाधन केंद्र या संस्थेच्या माध्यमातून उत्पासाहात पार पडला.
COMMENTS