Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय वादळाचा अर्थ!

महाराष्ट्राच्या राजकारणात होणार्‍या राजकीय भूकंपापेक्षा निकालाचा धक्का अनेकांना पचवणे शक्य झालेले दिसून येत नाही. कारण अनेक पक्ष फुटणार, भाजप ऑपर

महिलांचा सन्मान, मात्र सुरक्षेचे काय ?
सर्वसामान्यांना दिलासा !
दुबार पेरणीचे संकट

महाराष्ट्राच्या राजकारणात होणार्‍या राजकीय भूकंपापेक्षा निकालाचा धक्का अनेकांना पचवणे शक्य झालेले दिसून येत नाही. कारण अनेक पक्ष फुटणार, भाजप ऑपरेशन कमळराबवत असल्याच्या चर्चा झडत होत्या, त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. मात्र महायुतीला जे यश मिळाले, त्याचा अंदाज भाजपला देखील नव्हता. किंबहूना भाजपच्या नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील आपण 132 जागांवर विजय मिळवू असा विश्‍वास नव्हता. भाजपच्या नेत्यांना आपण सत्ता मिळवू, अशी अपेक्षा होती आणि ती कोणत्याही राजकीय पक्षाला असतेच, त्यात नवल नाही. मात्र आपण आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करू, याचा अंदाज भाजपला देखील नव्हता. त्यामुळे या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आपल्या तिन्ही भावांना भरभरून दिले आहे, असाच त्यातून अर्थ ध्वनित होतो. खरंतर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर काँगे्रस नेते नाना पटोेले, बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यांनी या पराभवाचे विश्‍लेषण केले आहे, तर अनेक नेत्यांन पुन्हा एकदा ईव्हीएमवर खापर फोडले आहे. मात्र त्यात खा. शरद पवारांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. खरंतर शरद पवारांची संसदीय आणि राजकीय कारकीर्द ही अर्धशतकांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शरद पवारांना राजकीय वार्‍याचा अंदाज आधीच येतो असे म्हणतात. त्यामुळे शरद पवारांना या राजकीय वादळाचा अर्थ कळला नसेल का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. खरंतर शरद पवारांच्या वयोमानामुळे त्यांच्यावर प्रचार सभा घेण्यावर मर्यादा होतात. मात्र तरीही त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मात्र बारामतीतील वातावरण शरद पवारांना कळले नसेल का? हा महत्वाचा प्रश्‍न आहे. लाडक्या बहिण योजनेचा मास्टरस्ट्रोक महाविकास आघाडीच्या विजयाच्या वारूला उधळून लावेल, याची कल्पना शरद पवारांना नव्हती का? असा सवाल उपस्थित होत आहे. खरंतर महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. पुलोदनंतर महाराष्ट्राने महाविकास आघाडीचा प्रयोग बघितला. त्यानंतर महायुतीचा प्रयोग राज्यात अस्तित्वात आला. त्यामुळे चाणाक्ष, जाणता राजा, चाणक्य अशा उपमा देणार्‍या शरद पवारांना या राजकीय वादळाचा अर्थ कळला नसेल असे नाही. खरंतर महाराष्ट्रातील ज्या जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपला, महायुतीला नाकारले, त्याच जनतेचे सहा महिन्यात परिवर्तन कसे झाले? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात आपला कौल कसा फिरवला? का संशोधनाचा विषय आहे. खरंतर लाडक्या बहिण योजनेने महिलांच्या हातात दोन पैसे मिळाले. याउलट महाविकास आघाडीने सुरूवातीला या योजनेला विरोधच केला. लाडका भाऊ कुठे, लाडका भाचा कुठे असे म्हणून या योजनेची खिल्ली उडवली. मात्र या योजनेची ताकद कळल्यानंतर महाविकास आघाडी या योजनेचे समर्थन करतांना दिसली. त्यातच आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असे स्वप्न प्रत्येक पक्षाला पडत होते, मात्र त्यासाठी ग्राऊंडवर जावून तयारी करण्याची तसदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली नाही. याउलट भाजप हा अतिशय सुक्ष्म नियोजन करून निवडणुका लढणार पक्ष आहे. त्यांच्यामागे असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फळी, त्यातून जनमाणसात असलेला कण जाणून त्यानुसार कृती करण्याची हातोटी, त्यासोबतच एक है तो सैफ है च्या नावावर पुन्हा एकदा हिंदू समाजाची एकगठ्ठा मिळवण्याची किमया महायुतीने केली आहे. खरंतर कटेंगे तो बटेंगेंचा नारा भाजपला आणि महायुतीला खड्डयात तर घेवून जाणार नाही, अशी भीती एव्हाना अजित पवार, नवाब मलिक, हसन मुश्रिफ यासरख्या नेत्यांच्या मनात होती. मात्र भाजपने आपले कॅम्पेन योग्यप्रकारे चालवले. सर्वत्र महाराष्ट्र या नेत्यांनी पिंजून काढला. अजित पवारांनी निवडणुकीपूर्वी काढलेली यात्रा त्यांना चांगलाच फायदा देवून गेली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील मेळावे घेत आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिले. याउलट भारत जोडो यात्रेनंतर काँगे्रसला लोकसभेत मिळालेल्या यशानंतर संपूर्ण जनाधार आपल्याच बाजूने असल्याच्या दिवास्वपनात काँगे्रस राहिली. आणि तिथेच काँगे्रसची फसगत झाली. खरंतर निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांनी नेहमीच सजग राहायला पाहिले.

COMMENTS