Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपप्रणीत महायुतीचा अभूतपूर्व विजय, अभिनंदन; ओबीसींनी घेतलेल्या भूमिकेतून साकारलेले यश!

महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुक निकाल, राज्यातील ओबीसींच्या दृष्टीने अभिनंदनीय आहे. ओबीसींनी भाजपप्रणीत महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करण्याचा

18 + साठी पुरेशा लसी आहेत का?
सचिव भांगे यांच्याकडून शासन निर्णयाला केराची टोपली
अहमदनगर मधील वकिलानेच कुत्र्यांच्या विरोधात खंडपीठात याचिका केली दाखल |

महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुक निकाल, राज्यातील ओबीसींच्या दृष्टीने अभिनंदनीय आहे. ओबीसींनी भाजपप्रणीत महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करण्याचा चंग निवडणूकीपूर्व बांधला होता. याचे कारण, राज्यातील सत्ताधारीवर्ग असलेल्या मराठा समाजाने आरक्षणाच्या भोवती एकवटत, ओबीसी समुदायाला भीतीत आणण्याचा प्रयत्न केला; त्याचा मुहतोड जवाब ओबीसी समुदायाने विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत महायुतीला मतदान करून, महायुतीचा अभूतपूर्व विजय महाराष्ट्राच्या भूमीवर साकार केला. ओबीसी हा कोणतीही भूमिका स्फोटक पद्धतीने पुढे आणत नाही. परंतु, लोकशाही व्यवस्थेमध्ये तो जेव्हा व्यक्त होतो; तेव्हा, मात्र तो आपल्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने एक स्फोटक भूमिका घेऊन क्रांतिकारी पाऊल उचलतो. अर्थात ओबीसींच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राचा सत्ता बदल न होता सत्ता कायम राहिली! पण, ती आणखी अभूतपूर्व पद्धतीने बहुमतात आली. आता, महाराष्ट्रात येत्या पाच वर्षात कोणत्याही प्रकारची राजकीय अस्थिरता राहणार नाही, याचा निर्णय ओबीसी ने थेटपणे घेतला. ओबीसींच्या आरक्षणात वाटा घेणारे हे ओबीसींना फारच भीतीत होते. परंतु, ओबीसींनी यावर आपली भूमिका घेऊन आपल्याला लोकशाही मार्गाने नेमकं काय करायचं आहे, हे ठरवत, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या भूमीतील सत्ताधारी वर्गाला त्यांची जागा दाखवली.  महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुतीची सत्ता स्थिर केली. या सत्तेच्या अनुषंगाने महायुती ने जो अडीच वर्षाचा कार्यकाळ चालवला, तोही किती योग्य पद्धतीने चालवण्याची, ती पोच पावती आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर मर्यादेच्या बाहेर जाणाऱ्या कोणत्याही समूहाला किंवा राजकीय आघाडीला नेमके कुठे कोंडीत पकडावे, हे सर्वात जास्त अचूकपणे जर कोणी ओळखत असेल तर, ते महाराष्ट्राचा आणि देशाचा ओबीसी ओळखतो. आज महायुतीला जो अभूतपूर्व विजय मिळाला, त्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा महाराष्ट्राच्या ओबीसी जनतेचा आहे. गेली अडीच वर्ष महाराष्ट्र अधिक स्थिर होता. ज्यामध्ये, ओबीसींच्या आरक्षणात वाटा हिस्सा मागणाऱ्यांनी आपले हिंसक स्वरूप असेल किंवा आक्रमक स्वरूप असेल, ते ओबीसींच्या विरोधात वापरले. त्यामुळे, अनेक ओबीसींच्या व्यवसायावर हल्ले झाले. त्याचप्रमाणे त्या त्या ठिकाणी जाळ पोळही झाल्या. परंतु, ओबीसी शांत राहिला. ओबीसी ने महाराष्ट्राच्या भूमीला कोणत्याही प्रकारे अशांत न करण्याची भूमिका घेतली.  योग्य वेळ आली तेव्हा, या सर्व बाबींचा ओबीसींनी, मुहतोड जबाब दिला. त्यामुळे आज भाजपप्रणीत महायुतीला जे राजकीय यश मिळाले आणि अभूतपूर्व बहुमत मिळवून ते सत्तेत पुन्हा येत आहेत, या गोष्टीचा महाराष्ट्राला आणि ओबीसींना सर्वाधिक आनंद आहे. ओबीसींनी आपल्या आरक्षणात वाटा मागणाऱ्यांना योग्य शिकवण दिली. हिस्सेदारांना सत्तेच्या बाहेर ठेवून आपल्या आरक्षणाची किंमत वसूल केली. ओबीसींनी महायुतीला सत्तेत आणून आपली ताकद दाखवली आहे.  ही ताकद महाराष्ट्रात इतकी अभूतपूर्व पद्धतीने व्यक्त झाली की, महाराष्ट्रात महायुतीच्या सत्तेत ओबीसींनी आता विसावा घेतला आहे. आजचा भाजपप्रणीत महायुतीचा विजय हा महाराष्ट्र आणि देशाच्या आगामी वीस वर्षाची नांदी आहे. ओबीसींनी नुकत्याच हरियाणात पार पडलेल्या निवडणुकीत देखील आपली शक्ती दाखवली. २०१३ मध्ये काॅंग्रेसने ओबीसींच्या आरक्षण यादीत जाट समुदायाला टाकले होते. त्यानंतरच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणूकीत तेथील ओबीसींनी भाजपला सत्तेत आणले. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत हरियाणात भाजप सत्तेत आहे. ही ओबीसींची ताकद आहे. त्यामुळे, आम्ही म्हणत आहोत की, भाजपप्रणीत महायुतीचा हा विजय आगामी १५-२० वर्षांची सत्ता नांदी ठरणार!

COMMENTS