Homeताज्या बातम्यादेश

आरोग्य विमा होणार स्वस्त ; जीएसटी कौन्सिलच्या बैठकीकडे लक्ष

नवी दिल्ली : आरोग्य विम्यावर असणार्‍या जीएसटीमुळे हा विमा महाग होत असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंब आरोग्य विमा घेत नाही, मात्र आता आरोग्य विमा स्वस

12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्‍न आता पंतप्रधानांच्या दरबारात
बैलपोळा निमित्त शेतकऱ्याकडून बैलाला चक्क देशी दारुचा प्रसाद
LOK News 24 I अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे बलात्कार

नवी दिल्ली : आरोग्य विम्यावर असणार्‍या जीएसटीमुळे हा विमा महाग होत असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंब आरोग्य विमा घेत नाही, मात्र आता आरोग्य विमा स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण राजस्थानमधील जैसलमेर येथे 21 डिसेंबर रोजी होणार्‍या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि आयुर्विमा हप्त्यावरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बाटलीबंद पाणी आणि सायकलवरील जीएसटीचे दरही कमी केले जाणार आहेत. मात्र, लक्झरीशी संबंधित काही वस्तूंवरील जीएसटीचा सध्याचा दर 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जीएसटी कौन्सिलच्या 55 वी बैठक 21 डिसेंबरला होत आहे. या बैठकीत सध्या आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यावरील 18 टक्के दर कमी केला जाणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून याची चर्चा सुरू आहे.

COMMENTS