Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हिजन-29 मुळे शहराची मेट्रो सिटीकडे वाटचाल: आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर : शहराचा आमदार या नात्याने आ.संग्राम जगताप यांनी गेल्या 10 वर्षात शहरात केलेल्या विकास कामांचे प्रगती पुस्तक दाखवून येणार्‍या 5 वर्षाच

अण्णा भाऊ साठेंच्या घर नुतनीकरणासाठीआमदार रोहित पवारांनी दिले 15 लाख रूपये
अल्टो कार व एसटी बस यांचा अपघातात एक जणांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी | ब्रेकिंग | LokNews24
साडेपाच महिन्यात होणार कोरोनाचा नायनाट? निमगाव वाघाच्या होईकात भाकित

अहिल्यानगर : शहराचा आमदार या नात्याने आ.संग्राम जगताप यांनी गेल्या 10 वर्षात शहरात केलेल्या विकास कामांचे प्रगती पुस्तक दाखवून येणार्‍या 5 वर्षाचे शहर विकासाचे ‘व्हिजन 29’ मांडले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्यात महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी सहकार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील तज्ञ व मान्यवरांच्या उपस्थितीत शहराचा भूतकाळ व बदलते भविष्य नगरकरांसमोर सचित्र मांडले. आ.जगतापांचे विकसित नगरचे सादरीकरण उपस्थितांना भावले. या उपक्रमाचे टाळ्यांच्या गजरात सर्वांनी कौतुक केले. शहरासाठी काय केले व पुढील पाच वर्षात काय करणार हे सांगणारे ते पहिलेच आमदार ठरले.
बर्‍याच वर्षांनंतर नगर शहराला संग्राम जगताप यांच्या रूपाने शहराला सत्ताधारी आमदार लाभले. त्यामुळे राज्य सरकार कडून शहराच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त करण्यात आ.जगतापांना मोठे यश आले आहे. त्यामुळेच शहरात कोट्यावधी रुपयांच्या निधीतून सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. यावेळी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आ.संग्राम जगताप यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या शहर विकास कामांची सविस्तर सचित्र माहिती मांडली. पूर्वाधात भविष्यातील विकासाचे ’व्हिजन 2029’ त्यांनी मांडताना सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही याच पद्धतीने कटिबद्ध राहून नागरिकांना चांगल्या अद्यावत सोयीसुविधा देण्याचे नियोजन केले आहे. शहराचा चेहरा-मोहरा बदलवून शहराची वाटचाल मेट्रो सिटी करण्याच्या दिशेने करण्यासाठी ‘व्हिजन 2029’ हे दमदार पाउल ठरणार आहे. यामध्ये मुबलक व नियमित पाणी पुरवठ्यासाठी फेज 3 पाणी योजना या 850 कोटींच्या योजनेला तत्वतः मान्यता. शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमधूनही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल व वातानुकूलित शाळा करणे. शहरातील गंजबाजार येथील भाजी मार्केटची अद्यावत इमारत उभारून नवनिर्मिती. आबाल वृद्धांसाठी शहराच्या विविध भागांमध्ये निसर्ग संपन्न उद्यानांचा विकास, सीना नदी परिसराचा कायापालट करत ऑक्सिजन पार्कची निर्मिती. शहर व उपनगर मधील नागरिकांच्या सोयीसाठी प्रदूषण मुक्त ई बस सेवा सुरु करणार. शहरातील महिलांसाठी नामांकित गृहउद्योगांमार्फत रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. बुरुडगाव व मुकुंदनगर भागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी भवनांची उभारणी करण्यात येईल.तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारली जाणार आहे. पिंपळगाव माळवी येथील महानगरपालिकेच्या 650 एकर जागेत थीम पार्कची निर्मिती होणार आहे. यामुळे शहरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे .शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यासाठी डी.एस.पी. चौक, एमआयडीसी मधील सन फार्मा चौक आणि सह्याद्री चौक येथे दुपदरी उड्डाणपुलाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी निधी देखील मंजूर झाला आहे. एम.आय.डी.सी.च्या विस्ताराच्या माध्यमातून नगर मधील युवकांना त्यांच्या हक्काचा रोजगार येथेच मिळणार आहे. यासोबतच सीना नदीच्या रुंदीकरण, खोलीकरणाचा आणि कायापालटाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील संग्राम जगताप यांनी यावेळी मांडला. यावेळी गेल्या पाच वर्षात शहराच्या विकासासाठी केलेल्या विकास कामांचे प्रगती पुस्तक आ.संग्राम जगताप यांनी मांडले. ते म्हणाले, गेल्या 5 वर्षात रस्ते विकासाला गती देताना शहरातील मुख्य डीपी रस्त्यांची कामे मजबुतीकरण, डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण करत पूर्णत्वाच्या टप्यावर आणली. तसेच शहराच्या विविध 42 भागांमधील रस्त्यांच्या विकासासाठी 400 कोटींची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाणी समस्येवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी मुळा धरण ते विळद घाट ते वसंत टेकडी दरम्यान पाइपलाइन, पंपिंग स्टेशन आणि साठवण टाक्या करिता 137 कोटींचा निधीसह पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. शहर कचराकुंडीमुक्त करण्यासाठी घंटागाड्यांची उपक्रम सुरु केला. जिल्हा ग्रंथालयाची नव्याने उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. सावेडीत नाट्यगृहाची निर्मिती करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. राज्य सरकारकडे पाठपुरावा करून विळद परिसरात शासनाकडून 600 एकर जागा एमआयडीसी विकासासाठी हस्तांतरीत झाली आहे. यामुळे उद्योग विकासासोबत रोजगार निर्मिती मोठी मदत होणार आहे. विजेची बचत करणार्या सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात येते आहे. शहर विकासाची ही कामे शहराच्या विकासाची पायाभरणीच ठरली आहेत.

COMMENTS