कराड / प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक कामासाठी नेमलेल्या कर्तव्यावरील सर्व कर्मचार्यांना चक्रिका अॅप डाउनलोड करणे बंधनकारक आहे, अशी माहिती कराड
कराड / प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक कामासाठी नेमलेल्या कर्तव्यावरील सर्व कर्मचार्यांना चक्रिका अॅप डाउनलोड करणे बंधनकारक आहे, अशी माहिती कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
निवडणुकीसाठी नेमलेल्या विभागीय प्रमुखांच्या प्रशिक्षणात ते बोलत होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, आचार संहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, प्रताप कोळी, एस. एस. पवार, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्रभारी नायब तहसीलदार युवराज पाटील उपस्थित होते.
म्हेत्रे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचार्यांचे लोकेशन कळावे, यासाठी मोबाईलमध्ये चक्रीका अॅप डाऊनलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहे. चक्रिका अॅप मतदानाच्या आदल्या दिवशी 19 नोव्हेंबरला व मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबरला सुरू ठेवणे बंधनकारक आहे.
या अॅपमुळे एखादे केंद्र त्यांना नेमून दिलेल्या केंद्रावर वेळेत पोहचले नसेल किंवा काही अनुचित प्रकार अथवा घटना घडत असेल तर ते या अॅपच्या माध्यमातून त्वरित कळणार आहे. त्याचा निवडणुक यंत्रणेला मोठा उपयोग होवुन संबंधित ठिकामी तातडीने उपाययोजना करणे सोपे होणार आहे. चक्रीका पमुळे कर्मचार्यांचे लोकेशन निवडणूक आयोगाला शेअर होत असते. या चक्रीका पमुळे कर्मचार्यांचे लाईव्ह लोकेशन मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांना दिलेल्या आयडी व मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करुन अॅप घ्यावे लागणार आहे.
COMMENTS