नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने अर्थात डीआरडीओने ओडिशाच्या किनार्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून भारताच्या पहिल्या लांब पल्
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने अर्थात डीआरडीओने ओडिशाच्या किनार्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या ध्वनीच्या वेगाच्या पाच पटींहून अधिक वेगवान (हायपरसॉनिक) क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र सशस्त्र दलांसाठी 1,500 किलोमीटरहून अधिक अंतरावर विविध प्रकारची स्फोटके, गुप्तचर उपकरणे किंवा इतर युद्धसामग्री (पेलोड) वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. क्षेपणास्त्राचा मागोवा अनेक कक्षांमध्ये तैनात करण्यात आलेल्या विविध श्रेणी प्रणालीद्वारे घेतला गेला.
COMMENTS