Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परिवर्तनामध्ये आमच्या महिला आघाडीवर असतील : स्नेहल नायकवडी

इस्लामपूर / प्रतिनिधी : क्रांतिकारकांचा तालुका म्हणून वाळव्याची ओळख आहे. इथे अन्याय सहन केला जात नाही. महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडक

ग्रामसभेबाबत अधिकारीच आले अडचणीत : सुशांत मोरे
सरकारे बदलली तरीही डॉ. दाभोळकरांचे सूत्रधार मोकाट : डॉ. राजेंद्र माने
रयतच्या अध्यक्षपदी शरद पवार पुन्हा बिनविरोध

इस्लामपूर / प्रतिनिधी : क्रांतिकारकांचा तालुका म्हणून वाळव्याची ओळख आहे. इथे अन्याय सहन केला जात नाही. महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात पहिला विरोध कोणी केला, तर तो येथील विद्यमान आमदारांनी केला. हे येथील महिलावर्गाला माहिती आहे. त्यामुळे यंदा इस्लामपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडवण्यात व निशिकांतदादांना विजयी करण्यात आमच्या या महिलाच आघाडीवर असतील, असा विश्‍वास स्नेहल गौरव नायकवडी व्यक्त केला.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ बैठकीत त्या बोलत होत्या. दरम्यान, त्यांनी वाळव्यासह परिसरातील मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या व संवाद साधला. यावेळी सुनीता भोसले-पाटील, तैसीन आत्तार, सुरेखा जगताप, धनश्री रसाळ प्रमुख उपस्थित होत्या.
स्नेहल नायकवडी म्हणाल्या, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे मतदान आहे. क्रांतिकारी निर्णय घेण्यामध्ये आजच्या महिला आघाडीवर आहेत. महिला विकासाचा महायुती सरकारचा रोड मॅप तयार आहे. हे सरकार महिला सक्षमीकरणासाठी काम करत असल्यामुळे अनेक महिला पुढे येऊन आम्हाला प्रोत्साहन देत आहेत. आता केवळ विकास कामाच्या गप्पा मारणार्‍या लोकप्रतिनिधींना घरी बसवण्याचा धाडसी निर्णय येथील स्वाभिमानी महिला भगिनींनी घेतलेला आहे. त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदार संघात यंदा परिवर्तन अटळ आहे.
समाजसेवा हेच आमच्या घराण्याचे संस्कार
सुनीता भोसले-पाटील म्हणाल्या, निशिकांत भोसले-पाटील प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य सुविधा पुरवत आहेत. महिलांचे आरोग्य सुस्थितीत राहावे, यासाठी प्रयत्न करत आहोत. समाजसेवा हे आमच्या घराण्याचे संस्कार आहेत. पुढेही असेच कार्य सुरू ठेवण्यासाठी या निवडणुकीत निशिकांतदादांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. मतदार संघातील महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी व त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी परिवर्तन घडवा.

COMMENTS