Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड अर्बन बँकेची दीपावलीच्या तीनही दिवशी एटीएमद्वारे ग्राहक सेवा

कराड / प्रतिनिधी : सर्वत्र दीपावलीची धामधूम सुरू असताना आपल्या ग्राहकांची गैरसोय टाळावी म्हणून सकल जनांसी आधारू या आपल्या ब्रीद वाक्याप्रमाणेच

महाविकास आघाडीची विकास पताका घेऊन धावल्या कोयना-महाराष्ट्र एक्सप्रेस
आ. जयंत पाटील यांनी आडवे पडायचे काम केले : आ. सदाभाऊ खोत
शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; राजकीय वादातून हल्ला झाल्याची चर्चा

कराड / प्रतिनिधी : सर्वत्र दीपावलीची धामधूम सुरू असताना आपल्या ग्राहकांची गैरसोय टाळावी म्हणून सकल जनांसी आधारू या आपल्या ब्रीद वाक्याप्रमाणेच दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक. लि., कराड ने आपल्या 44 एटीएम सेंटर वरून सर्व ग्राहकांना दीपावलीच्या तीनही दिवशी म्हणजेच दि. 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुट्टीच्या कालावधीत देखील अखंडीत ग्राहक सेवा बजाविली.
दीपावली सणानिमित्त पुणे, मुंबई व विविध भागातून गावाकडे आलेल्या लोकांची संख्या जास्त होती आणि सलग सुट्ट्या आल्याने ग्रामीण भागातील सर्व एटीएम सेंटर्सवर कॅशचा तुटवडा होता. शासकिय सुट्ट्या असूनही कराड अर्बन बँकेच्या व्यवस्थापनाने सेवकांना सूचना करून एटीएम सेवा उपलब्ध करून दिल्याने सर्व ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कराड अर्बन बँकेचे एकूण 44 एटीएम सेंटर्स आहेत. दीपावलीच्या सुट्टीच्या तीन दिवसात एटीएममधून एकूण 10,600 इतक्या व्यवहारांची नोंद झाली आणि 4.50 कोटी कॅश ग्राहकांनी विड्रॉल केली. दीपावलीच्या तीन दिवसामध्ये ग्राहकांना अहोरात्र सेवा देत तब्बल 72 तास विनाविलंब सेवा उपलब्ध करून दिली. बँकेचे एटीएम सलग चालू ठेवून ग्राहकांना दिपावली सणानिमित्त उत्तम प्रतीची सेवा देण्यात आली. त्यामुळे ग्राहकांची दीपावली उत्साहात साजरी झाली. ह्याचा आनंद बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व सर्व संचालक मंडळाला झाला. अशीच ग्राहक सेवा बँकेकडून इथून पुढच्या काळात ही एटीएमच्या माध्यमातून देण्यात येईल, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी दिली.

COMMENTS