Homeताज्या बातम्यासंपादकीय

पंकजा मुंडेंची सैद्धान्तिक बंडखोरी !

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, राज्याच्या माजी मंत्री आणि वर्तमान विधानपरिषद सदस्य असलेल्या पंकजा मुंडे यांनी काल जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्यावर

देशहितवादीचे येत्या रविवारी बाळासाहेब थोरातांच्या हस्ते प्रकाशन
तोतया पोलिसांच्या कारनाम्याचा पर्दाफाश; दुचाकीसह दोघे अटकेत
हसन मुश्रीफांच्या घरी ईडीची छापेमारी

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, राज्याच्या माजी मंत्री आणि वर्तमान विधानपरिषद सदस्य असलेल्या पंकजा मुंडे यांनी काल जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्यावर भारतीय जन माणसाने आणि राजकारण्यांनी ही आत्मचिंतन करावं असं आहे! गेल्या दहा वर्षात देशातून सार्वजनिक संपत्तीची लूट करत, बँकांमधून पैसा ओरबाडत ज्यांनी देश सोडला, असे सगळे पळपुटे पुरुष आहेत; त्यामुळे, देशाच्या संपत्तीचे रक्षण या महिलाच करू शकतात! त्यामुळे देशाच्या संपत्तीच्या चाव्या या महिला शक्तीकडे सोपाव्यात, असं त्यांनी जे वक्तव्य केलं, ते निश्चितपणे स्त्रीसत्ताक व्यवस्थेच्या समर्थनात आहे. मातृसत्ताक व्यवस्थेच्या समर्थनात आहे. मात्र, त्या, ज्या पक्षात कार्यरत आहेत, तो पक्ष मातृसत्ता, स्त्रीसत्ता एवढेच नव्हे तर स्त्री समता या सिद्धांताच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे केवळ भारतीय राजकारण्यांना आणि जनमानसालाच आव्हानात्मक नाही, तर, ते आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाला देखील पुनर्विचार करायला लावणारं आहे! एक प्रकारे त्यांचा हा विचार बंडखोर विचार आहे.  या बंडखोर विचाराची किंमत त्यांना पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षात चुकवावी लागू शकते. परंतु, त्याची परवा न बाळगता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. अर्थात, ‘मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे’, असं वक्तव्य जेव्हा त्यांनी केलं, त्याचे परिणाम त्यांना राजकारणात भोगावे लागत आहेत. त्यामुळे, त्यांचं मंत्रिपद गेलं, त्यांचा विधानसभा सदस्यत्व गेलं, त्यांची खासदारकी पराभूत व्हावी लागली, मग पक्षात त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना पक्षात टिकवणे आवश्यक आहे; याचा शेवटी विचार झाला. त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यात आलं. मात्र, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा बंडखोर विचार मांडला असल्यामुळे, या विचारांची सल संघ-भाजपच्या मनात नेमकी काय असेल आणि त्याची त्यांना काय किंमत चुकवावी लागेल, हे मात्र लगेच सांगता येणार नाही; परंतु, स्त्रीसत्ता किंवा मातृ सत्ता व्यवस्थेचा विचार मांडत असताना, पक्षांतर्गत सिद्धांतिक बंडखोरी देखील आहे, हेही तेवढेच सत्य! मात्र, पक्षांतर्गत अशा प्रकारचे बंडखोर विचार मांडण्यासाठी जे साहस लागतं, ते साहस निश्चितपणे पंकजा मुंडे यांच्यामध्ये आहे. अर्थात, पंकजा मुंडे यांची राजकीय शक्ती कमकुवत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी राज्यातल्या विरोधी पक्षांची मदत अंतर्गत घेतली असावी; असा अंदाज अनेक राजकीय धुरिणांनी यापूर्वी व्यक्त केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे वक्तव्य देशातून सार्वजनिक संपत्तीची लूट करून पळणाऱ्या उद्योजकांच्या विरोधात असलं तरी, त्यांनी स्त्री शक्तीच्या हातात देशाच्या संपत्तीची सूत्रे द्या, याचा अर्थ देशाची सत्ताच स्त्रियांच्या हातात द्या, असं त्यात थेट म्हणाल्या आहेत.  राज्याच्या पुरुषसत्ताक राजकीय नेतृत्वाला भान यावं, एवढा बंडखोर विचार त्यांनी मांडलेला आहे. या विचाराचे परिणाम पुरुषशक्ती एकत्र येऊन निश्चितपणे त्यांच्या विरोधात कारवाया करतीलच. परंतु, राजकारणात आणि समाज जीवनात साहस असणं हे नेहमीच समाज जीवनाच्या दृष्टीने कौतुकास्पद राहिलेले आहे. पंकजा मुंडे यांचे राजकारण वादग्रस्त असेल किंवा अनेक काही बाबी असतील, परंतु, सिद्धांतिक राजकारण करताना त्यांनी मात्र नेहमीच आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी भाजप अंतर्गतच आव्हान उभे केलेले आहे. त्यांचे हे आव्हान महाराष्ट्राची स्त्री नेता होण्यापर्यंत आणि एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहण्यापर्यंत गेलेलं होतं.  त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचं खच्चीकरण करण्यासाठी धुरंदर सरसावले. अर्थात, त्या केवळ स्त्री आहेत म्हणूनच ही शक्ती त्यांच्या विरोधात गेली नाही; तर, त्या प्रवर्गनिहाय ओबीसी आहेत. त्यामुळे ही त्यांच्या विरोधात मोठा खल झाला आहे. हे उभ्या महाराष्ट्राला निश्चितपणे कळते. परंतु, एवढे असूनही त्या कधीही हिम्मत हारलेल्या नाहीत. राजकीय जीवनातील सिद्धांतिक साहस हे त्यांनी नेहमीच बाळगले आहे. त्यामुळे त्यांचं वक्तृत्व किंवा त्यांचे वक्तव्य हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे, यात कोणतीही शंका असण्याचं कारण नाही.

COMMENTS