नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरसंबंधित कलम 370 केंद्र सरकारने हटवल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका पार पडल्या असून नवे सरकार सत्तेवर आले आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरसंबंधित कलम 370 केंद्र सरकारने हटवल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका पार पडल्या असून नवे सरकार सत्तेवर आले आहे. दरम्यान जम्मू-काश्मीरचे विधानसभेचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात मोदी सरकारने हटवलेले कलम 370 पुन्हा कायम करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारकडून सुरू आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा अधिवेशनातील तिसर्या दिवशी कलम 370 पुन्हा कायम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. भाजप आणि नॅशनल कॉन्फ्रेंस व काँग्रेस आमने-सामने आले आहेत.
केंद्रातील मोदी सरकारने धाडसी निर्णय घेत, कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला होता. जम्मू काश्मीर विधानसभेत राष्ट्रपती राजवट लागू असताना हे कलम हटवले होते. त्यानंतर, देशभरात या घटनेवरुन अनेक मतमतांतरे पाहायला मिळाली. काही महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या नेतृत्वात तिथे सरकार स्थापन झाले, त्यानंतर हे कलम पुन्हा लागू करण्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप आमदारांच्या विरोधानंतरही जम्मू काश्मीर विधानसभेत उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी यांनी कलम पुन्हा लागू 370 करण्याचा प्रस्ताव ठेवला. सत्ताधारी नॅशनल कॉन्फ्रेंस व काँग्रेस आमदारांनी या प्रस्तावाचे समर्थन करताच भाजप आमदारांनी विरोधात घोषणाबाजी केली. ’5 ऑगस्ट झिंदाबाद’ आणि ’जहां हुए बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा है’, असा नारा देत या प्रस्तावाचा प्रखर विरोध केला. त्यामुळे, जम्मू काश्मीर विधानसभेत मोठा राडा झाला आहे.
COMMENTS