Homeताज्या बातम्यादेश

महासत्तेच्या चाव्या पुन्हा ट्रम्प यांच्याकडे!

न्यूयार्क : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदार पार पडल्यानंतर बुधवारी मतमोजणी करण्यात येत आहे. या निवडणुकीत उपराष्ट्रपती कमला हॅरिस

बाबूजींचे पुण्यस्मरण हे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय : जगन्नाथ महाराज शास्त्री
Sangamner : हजरत ख्वाजा पिरमोहंमद सादीक यांचा उरूस साध्या पद्धतीने साजरा
जळगाव जिल्ह्यातील अपघातात तिघे ठार

न्यूयार्क : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदार पार पडल्यानंतर बुधवारी मतमोजणी करण्यात येत आहे. या निवडणुकीत उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत होत आहे. या मतमोजणीत हाती आलेल्या कलांनुसार ट्रम्प यांनी 277 जागांवर आघाडी घेतल्यामुळे अमेरिकेत सत्तांतर झाले असून महासत्तेच्या चाव्या ट्रम्प यांच्याकडे आल्याचे दिसून येत आहे.
दोन्हीही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर होते. आता कमला हॅरिस यांनी दमदार वापसी केली होती. मात्र नंतर ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा गाठला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरेकिचे 47 वे राष्ट्रपती बनणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस यांच्याविरोधात विजय मिळवल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, हा आमच्यासाठी एक शानदार विजय आहे ज्यामुळे आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ट्रम्प यांनी बहुमताचा 270 चा आकडा पार पडला आहे. त्यांना 277 जागा मिळाल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, अमेरिकेच्या माध्यमांनी यापूर्वीच रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी घोषित केले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी 2016 मध्ये हिलरी क्लिटंन यांच्याविरोधात निवडणूक जिंकली होती. या निवडणुकीत ट्रम्प हॅरिस यांच्याविरोधात मोठा विजय मिळला असल्याचे मीडिया हाऊसचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या मीडिया हाऊसने दिलेल्या माहितीनुसार नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांनी नॉर्थ कॅरोलिना, विस्कॉन्सिन, पेन्सिल्व्हेनिया आणि जॉर्जिया सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवत 270 इलेक्टोरल मतांचा जादुई आकडा ट्रम्प यांनी गाठला आहे. मात्र, विजेत्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. हॅरिस यांच्यातुलनेत ट्रम्प यांची मोठी आघाडी घेतली आहे. त्यांना 277 इलेक्टोरल मते मिळाली आहेत. तर विजयासाठी 270 जागांची गरज आहे. तर हॅरिस 214 जागांवर मते मिळाली आहे. हॅरिस यांनी हार्वर्ड विद्यापीठातील भाषणाचा कार्यक्रमही रद्द केला आहे. सध्या त्यांच्या समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले आहे. हा अमेरिकन जनतेचा शानदार विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS