इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तनाची नांदी सुरू असून लोकांना बदल हवा आहे. विरोधकांच्या हुकूमशाही व दडपशाहीला जनता क
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तनाची नांदी सुरू असून लोकांना बदल हवा आहे. विरोधकांच्या हुकूमशाही व दडपशाहीला जनता कंटाळली आहे, असे प्रतिपादन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघात प्रचार दौर्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी इस्लामपूर शहरातील हनुमाननगर, महादेव नगर, शास्त्री कॉलनी आदी भागातील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, या तालुक्यातील लोकांना गुलामगिरतीतून मुक्त करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. लाडकी बहीण योजनेचे स्वागत सार्या राज्यातील आमदार व भगिनींनी केले. परंतु या योजनेला या तालुक्यातील आमदारांनी विरोध केला. त्यांनी बारामतीची स्वप्ने येथील जनतेला दाखवली. पण त्यांनी 35 वर्षात फक्त करामती करण्याचे काम केले. या तालुक्यात विकास सर्वसामान्य लोकांचा झाला नाही तर तो या आमदारांच्या पै-पाहुण्यांचा झाला. 40 वर्षात पाणंद रस्ते झाले नाहीत. आता आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचे पाणंद रस्ते केले. निशिकांतदादा लाडकी बहीण योजना आणून गोरगरीब माता-भगिनींना आधार दिला. या नेत्याने फक्त घराघरात भांडणे लावून गटा-तटाचे राजकारण करत हुकूमशाही पद्धतीने सत्ता भोगली. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधीना बाजुला करण्याची संधी आपल्याकडे आली आहे. त्यामुळे सर्वांनी या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS